प्रतिबंधित मद्याचे १ हजार खोके जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:54+5:302021-04-25T04:14:54+5:30

--- नाशिक : गोवा राज्यातून नाशिकमध्ये वाहून आणला जाणारा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने ...

1,000 boxes of banned liquor seized | प्रतिबंधित मद्याचे १ हजार खोके जप्त

प्रतिबंधित मद्याचे १ हजार खोके जप्त

Next

---

नाशिक : गोवा राज्यातून नाशिकमध्ये वाहून आणला जाणारा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जप्त केला. राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याचे सुमारे एक हजार २८० खोके आणि एक ट्रक असा सुमारे १ कोटी ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यात राजस्थानच्या दोघा संशयितांना अटक करण्यास पथकाला यश आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे राज्यभरात मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. कडक निर्बंधांची अंमलबजावणी करताना अवैद्य मद्यतस्करीविरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरू केली आहे. आयुक्त महोदय कांतिलाल उमाप, उषा वर्मा तसेच विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ आणि अधीक्षक, डॉ. मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. नाशिक विभागीय भरारी पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमीनुसार शनिवारी (दि. २४) नगर-मनमाड रोडवरील येवला टोलनाक्याजवळ, पिंपळगाव जलाल शिवारात पथकाने सापळा रचला.

रस्त्यावरून भरधाव जाणारा संशयास्पद चौदाचाकी ट्रक (यू पी८२-टी-९०७७) पथकाने रोखला. या ट्रकची तपासणी केली असता वाहनामध्ये चोरकप्प्यातून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले व परराज्यातील निर्मित असलेला मोठा मद्यसाठा लपवून वाहून नेला जात असल्याचे उघडकीस आले. पथकाने ट्रकचालक संशयित भगवानदास धनसिंग कुशवाह (४१, रा. धोलपूर, राजस्थान), विनोद फुलसिंग कुशवाह(३६, रा. जि. लपूर, राजस्थान) यांना अटक केली आहे.

विदेशी मद्याचा जप्त केलेला साठा असा....

१) इम्पेरिअल ब्लुल्यू व्हिस्की ७५० मिली क्षमतेच्या एकूण २१०० बाटल्यांचे १७५ बॉक्स) १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण १५ हजार, ३६० बाटल्यांचे ३२० बॉक्स,

रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या एकूण ६०० बाटल्यांचे ५० बॉक्स, १८० मि.ली क्षमतेच्या एकूण २४०० बाटल्यांचे ५० बॉक्स, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या एकूण १०२० बाटल्यांचे ८५ बॉक्स, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ९,६०० बाटल्यांचे २०० बॉक्स, किंगफिशर बीअरच्या ५०० मि.ली. क्षमतेच्या एकूण १६०० टिन असलेले ४०० बॉक्स असा मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला एन्ड्रॉइड मोबाइल व एक साधा मोबाइल आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे.

------इन्फो---

चिनी मातीच्या शौचकुपांच्या वाहतुकीचा बनाव

वाळलेल्या गवताच्या गंजीमधून त्यामध्ये दडवून ठेवलेल्या चिनी मातीच्या शौचकुपांसह वॉशबेसिनच्या भांड्यांचा माल वाहतूक करत असल्याचा बनाव मद्यतस्करीसाठी संबंधितांनी केल्याचे उघड झाले आहे. तुटलेल्या भांड्यांचे २०० नग आणि चिनी मातीचे तुटलेल्या अवस्थेतील शौचकुपांचे १५० नग आढळून आले आहे. विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक आर.एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक सुरेश रावते, ए.डी. पाटील, जवान गोकुळ शिंदे, लोकेश गायकवाड, विठ्ठल हाके आदींनी यशस्वीरीत्या सापळा रचून ही कारवाई पार पाडली.

Web Title: 1,000 boxes of banned liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.