विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:44 PM2020-11-22T21:44:13+5:302020-11-23T01:58:38+5:30
सिन्नर: व्यावसायिक रावसाहेब आढाव यांनी आपल्या आई वडिल यांचे स्मृती प्रित्यर्थ सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स, सॅनेटायझर फवारणी पंप तर माध्य. विद्यामंदिर,सरदवाडी शाळेस उच्च दर्जाची टेंपरेचर गन भेट म्हणून दिली.
सिन्नर: व्यावसायिक रावसाहेब आढाव यांनी आपल्या आई वडिल यांचे स्मृती प्रित्यर्थ सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स, सॅनेटायझर फवारणी पंप तर माध्य. विद्यामंदिर,सरदवाडी शाळेस उच्च दर्जाची टेंपरेचर गन भेट म्हणून दिली.
मातृ देवो भव, पितृ देवो भव. हे सुभाषित आचरणात आणत आहे, त्याप्रमाणे वर्तन करीत आहे, इतकच. आई-वडिलांनी केलेले संस्कार, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून मी वाटचाल करीत आहे, त्यामुळेच जीवनात यशस्वी होऊ शकलो. दरवर्षी आई-वडिलांच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून, आपल्या आई-वडिलांना प्रती आदर व्यक्त करावा, त्यांची आठवण तुमच्या सगळ्यांसोबत काढावी म्हणून आपल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व मातोश्री चं. व अ. चांडक कन्या विद्यालय विद्यार्थ्यांचे पालक व यशस्वी व्यावसायिक रावसाहेब आढाव यांनी आपल्या आई वडिल यांचे स्मृती प्रित्यर्थ सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स, सॅनेटायझर फवारणी पंप तर माध्य. विद्यामंदिर,सरदवाडी शाळेस उच्च दर्जाची टेंपरेचर गन भेट म्हणून दिली.
रावसाहेब आढाव यांनी पुढे आपल्या मनोगतातून सांगितले की, आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती पण आई वडिलांनी अतिशय काबाड कष्ट करून आम्हा भावंडांना वाढवले, चांगले संस्कार आमच्यावर केले, स्वतःच्या हौस मौज, आवड बाजूला ठेवून आम्हा भावंडांना चांगले शिकविले ,
आई वडिलांची आठवण , तुमच्यासोबत काढावी ,म्हणून ही छोटीशी मदत करत आहे ,कारण आई-वडिलांनीच हा संस्कार आमच्यावर केला की आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतोय.ते कृतार्थ भावनेने नियमित देत रहावे.
यावेळी मंचावर चांडक कन्या विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अॅडवोकेट श्रीराम क्षत्रिय, भाऊसाहेब आढाव,रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर चे अध्यक्ष महेश बोराडे, डॉ.भूषण वाघ, बाळासाहेब सदगीर ,सुनील भडांगे, भाऊसाहेब ढोने, प्रदीप दिवे, विनोद दंताळ, हे मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ. माधवी पंडित यांनी प्रास्ताविक केले, पर्यवेक्षक सुनील हांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, पर्यवेक्षक चंद्रभान कोटकर यांनी आभार मानले. सौ. दुसाने यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल मुळे, कांतीलाल कासार,योगेश कुलकर्णी, गणपत बेझेकर यांनी परिश्रम घेतले.