जिल्ह्यात पुन्हा आढळले १ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:52 AM2020-09-07T00:52:37+5:302020-09-07T00:52:37+5:30

नाशिक : जिल्ह्याची बाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. रविवारी (दि.६) जिल्ह्यात रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात १ हजार १७४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४३ हजार ६९० इतकी झाली आहे. १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९३३ झाला आहे. दिवसभरात ९३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

1000 patients found again in the district | जिल्ह्यात पुन्हा आढळले १ हजार रुग्ण

जिल्ह्यात पुन्हा आढळले १ हजार रुग्ण

Next
ठळक मुद्दे१२ बळी : बाधितांचा आकडा सरकला ४३ हजारांच्या पुढे

नाशिक : जिल्ह्याची बाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. रविवारी (दि.६) जिल्ह्यात रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात १ हजार १७४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४३ हजार ६९० इतकी झाली आहे. १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९३३ झाला आहे. दिवसभरात ९३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
सण-उत्सवांचा काळात शहरासह जिल्ह्यात अचानकपणे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २७२ संशयित रु ग्ण विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत.

नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक कठीण होत चालली आहे. रविवारी शहरात ७६८, तर ग्रामीण भागात ३५१ आणि मालेगावात ५३ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात ८ नाशिक शहरातील, ग्रामीणमध्ये ३ व मालेगावातील १ रुग्णाचा समावेश आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी झाली होती.
दीडशे ते पावणेदोनशेच्या पटीत रुग्ण आढळून येत होते; मात्र रविवारी पुन्हा रुग्णसंख्या साडेतीनशेपर्यंत जाऊन पोहोचली. एकूणच शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने गाव, तालुका पातळीवरसुद्धा सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
यापैकी १ हजार ८५ रु ग्ण शहरातील आहेत. शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्या वाढू लागली असून, यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहराची परिस्थिती गंभीरजिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ७ हजार ६९१ रुग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ५३७ रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४६ हजार ३६६ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Web Title: 1000 patients found again in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.