जिल्ह्यात १००३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:16+5:302021-05-31T04:12:16+5:30

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.३०) नवीन ६७० कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १००३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात २९ ...

1003 corona free in the district | जिल्ह्यात १००३ कोरोनामुक्त

जिल्ह्यात १००३ कोरोनामुक्त

Next

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.३०) नवीन ६७० कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १००३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात २९ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४६६६ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १०,१३३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २३४, नाशिक ग्रामीणला ४०१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ०८, ग्रामीणला २४, असा एकूण २९ जणांचा बळी गेला आहे. ग्रामीणमधील बळींची संख्या शहराच्या तुलनेत पुन्हा अडीच पट झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९६.१६ टक्क्यांवर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९६.८७ टक्के, नाशिक शहर ९७.०४ टक्के, नाशिक ग्रामीण ९५.३५, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.४४ टक्क्यांवर पाेहोचला आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल तीन महिन्यांनी हजारपेक्षा कमी

जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या फेब्रुवारी महिन्यानंतर प्रथमच एक हजाराच्या खाली पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीण ४८७, नाशिक मनपा ३४१, मालेगाव मनपाच्या ११८ अहवालांचा समावेश आहे. ग्रामीणमध्येदेखील रुग्णसंख्या वाढीचा दर काहीसा कमी होऊ लागला असल्यानेच प्रलंबित अहवालांमध्ये ग्रामीणचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे.

Web Title: 1003 corona free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.