ओझर येथे १०१ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:10 IST2021-04-10T21:15:10+5:302021-04-11T00:10:10+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी (दि.१०) १०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. ओझरसह परिसरातील आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओझर येथे १०१ नवीन रुग्ण
ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी (दि.१०) १०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. ओझरसह परिसरातील आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओझरसह परिसरातील १०१ रुग्णांचा अहवाल शनिवारी (दि.१०) कोरोना बाधित आला आहे. त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्णसंख्या एकूण २,५८७ झाली आहे, पैकी ४३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. १७९९ रुग्ण बरे झाले आहेत.
७४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पैकी १२६ रुग्णांवर रुग्णालयात तर ६१९ रुग्ण घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. परिसरातील एकूण कंटेन्मेंट झोनसंख्या १२८३ झाली असून, ६४४ झोन पूर्ण झाले आहेत.