१०४ बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:58 AM2020-11-13T00:58:38+5:302020-11-13T00:58:59+5:30
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १३) एकूण १६१ नवीन बाधित रुग्ण दाखल झाले असून, १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी २ रुग्ण याप्रमाणे एकूण ४ जण मृत झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १७१९ झाली आहे.
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १३) एकूण १६१ नवीन बाधित रुग्ण दाखल झाले असून, १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी २ रुग्ण याप्रमाणे एकूण ४ जण मृत झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १७१९ झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९६ हजार ४३० वर पोहोचली असून, त्यातील ९१ हजार ८४७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. २८६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.२५वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.०३, नाशिक ग्रामीणला ९३.८४, मालेगाव शहरात ९३.१३, तर जिल्हाबाह्य ९२.६९ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २८६४ बाधित रुग्णांमध्ये १६५० रुग्ण नाशिक शहरात,१०७८ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १२० रुग्ण मालेगावमध्ये, तर १६ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ४७ हजार ७२५ असून, त्यातील दोन लाख ५० हजार ८९० रुग्ण निगेटिव्ह, तर ९६ हजार ४३०रुग्ण बाधित आढळून आले असून, ४३० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.