जिल्ह्यात १०४ मिमी पावसाची नोंद
By admin | Published: October 15, 2016 12:17 AM2016-10-15T00:17:42+5:302016-10-15T00:28:14+5:30
जिल्ह्यात १०४ मिमी पावसाची नोंद
घननिळा बरसला : विभागात नगरला सर्वाधिक पाऊस; धुळे जिल्ह्यात कमी पाऊसंमनोज मालपाणी ल्ल नाशिकरोड
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रावर वरुणराजाची कृपा झाली आणि उत्तर महाराष्ट्रात धो - धो पाऊस बरसला. पाण्याची टंचाई असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला, तर त्या खालोखाल नाशिकमध्ये पाऊस पडला.
पाण्यामुळे निर्माण झालेला दुष्काळ आणि त्यामुळे राजकीय वातावरणही ढवळून निघाल्यानंतर न्यायालयापर्यंत पाण्याचे प्रकरण पोहचले. पाण्याचे आवर्तन आणि पाणी राखीव ठेवण्याच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर अनेक वाद-प्रतिवाद झाले, जर यंदा पाऊस बरसलाच नाही तर काय होणार, अशी चिंता सर्वत्र लागलेली असताना उत्तर महाराष्ट्रावर पावसाची कृपा झाली.
यावर्षी सर्वाधिक पाऊस नगर जिल्ह्यात आतापर्यंत (१४६.७ मि.मी.) व या खालोखाल नाशिक जिल्ह्यात (१०४.५ मि.मी.) पडला आहे. विभागातील ५४ तालुक्यांपैकी ३५ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आतापर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात
आहे.
नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात सोमवार (दि.३) सायंकाळपर्यंत १०६५.८ मि.मी. (१०४.५ टक्के), धुळे - ४८४.५ मि.मी. (९०.७ टक्के), नंदुरबार - ७१८.५ मि.मी. (८५.६ टक्के), जळगाव - ६६७.७ मि.मी. (१००.१ टक्के), अहमदनगर - ६४९ मि.मी. (१४६.७ टक्के) पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीनुसार नाशिक - ९९.१ टक्का, धुळे - ८५.६ टक्के, नंदुरबार - ८२ टक्के, जळगाव - ९५.१ टक्के, अहमदनगर - १३०.५ टक्के पाऊस पडला आहे.
तालुक्यात पडलेला पाऊस
नाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी ३५ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, तर ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत - १५ तालुके ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत तीन तालुक्यांत पाऊस पडला आहे, तर २६ ते ५० टक्क्यांदरम्यान एकमेव धुळे तालुक्यात पाऊस झाला आहे. धुळे तालुका - ५६० मि.मी., शिंदखेडा- ५१२, शिरपूर- ६४९, साक्री- ४१५ असा एकूण धुळे जिल्ह्यात सरासरी
२१३६ मि.मी. पाऊस पडला आहे.
नंदुरबार - ६४८ मि.मी., शहादा- ६९०, अक्रानी - ७६६,
अक्कलकुवा- १०३२, तळोदा- ७७६, नवापूर - ११२७ असा एकूण नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ८४० मि.मी. पाऊस पडला आहे. जळगाव - ६९१ मि.मी., जामनेर - ७२६, एरंडोल - ६२७, धरणगाव - ६२७, भुसावळ - ६७३,
बोदवड - ६७३, यावल - ७०१, रावेर - ६७२, मुक्ताईनगर - ६३०,
अमळनेर - ५८६, चोपडा - ६९४, पारोळा - ६२०, पाचोरा - ७४८, चाळीसगाव - ६६५, भडगाव -
६७४ असा एकूण जळगाव जिल्ह्यात सरासरी ६६७ मि.मी. पाऊस
पडला आहे, तर अकोला - ४४२ मि.मी., संगमनेर - ३६६, कोपरगाव - ३८९, श्रीरामपूर - ४२०, राहुरी - ४२५, नेवासा - ४७५, राहता - ३८९, शेवगाव - ५१५, पाथर्डी - ४९६, श्रीगोंदा - ३७९, कर्जत - ४४३, जामखेड - ५७३, पारनेर - ४१६, अहमदनगर - ४६६
असा एकूण अहमदनगर
जिल्ह्यात सरासरी ४४२
मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.