वरिष्ठ, निवड श्रेणीचे १०६ प्रस्ताव प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:52+5:302021-07-05T04:10:52+5:30
नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग यांची संयुक्त सहविचार सभा क्रांतिवीर ...
नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग यांची संयुक्त सहविचार सभा क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत झाली. यावेळी माध्यमिक कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार, उपशिक्षणाधिकारी व्ही. आर. बागूल, अधीक्षक वेतन पथक उदय देवरे, पी. यू. पिंगळकर, सीताराम हगवणे आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वादांकित संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्या सुनावणी होऊन मागील महिन्यात अनेक प्रश्न मार्गी लावले. काही संस्थांवर कायदेशीर कारवाई व प्रशासक नेमण्याची शिफारस केलेली आहे. शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून काम करून घेतले जाईल. प्रत्येक घटकाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही झनकर यांनी सांगितले. शिक्षकेतर कर्मचारी १२ वर्षे कालबद्ध पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ कर्मचाऱ्यांना देणे तसेच सन २०१८-१९ च्या संच मान्यतेनुसार मंजूर पदाचे प्रस्तावास त्वरित मान्यता देण्याचा आग्रह संघाने धरला. प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन बी. के. सानप यांनी केले, तर आभार प्रदीप सांगळे यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख, गुफरान अन्सारी, प्रदीप सांगळे, पुरुषोत्तम रकीबे, परवेजा शेख, अशोक कदम, बी. डी. गांगुर्डे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर आदी उपस्थित होते.
कोट....
दप्तर दिरंगाईचा विषय अत्यंत गंभीर आहे. याबाबत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण कार्यालय व पे युनिट यांना पत्र दिलेले असतानाही त्याची वेळीच दखल न घेतल्याने ही बैठक घ्यावी लागली. यापुढे दप्तर दिरंगाई होणार नाही, या आश्वासनानंतर जिल्ह्यातील संस्थेचे पुढील विषय घेण्यात आले. दप्तर दिरंगाई करू नये, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे.
-एस. बी. देशमुख, सचिव, मुख्याध्यापक संघ