जिल्ह्यात १०६१ कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:27+5:302021-05-27T04:15:27+5:30
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) नवीन १०९३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ ...
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) नवीन १०९३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४५१४वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त आणि कोरोनाबाधितांची संख्या बुधवारी समकक्ष समान स्तरावर आली. त्यामुळे एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १४,३९७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४०३, नाशिक ग्रामीणला ६७४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १६ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १९, ग्रामीणला १६ असा एकूण ३५ जणांचा बळी गेला आहे. ग्रामीणमधील बळींची संख्या काहीशी घटली आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९५ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९५.०५ टक्क्यांवर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९८.०५ टक्के, नाशिक शहर ९६.५१ टक्के, नाशिक ग्रामीण ९३.१६, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.५४ टक्क्यांवर पाेहोचला आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल अडीच हजारांवर
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा अडीच हजारांपेक्षा थोडी अधिक २५३२वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ११२५, नाशिक मनपाचे १२५२, मालेगाव मनपाचे १५५ अहवालांचा समावेश आहे. ग्रामीणमध्येदेखील रुग्णसंख्या वाढीचा दर काहीसा कमी होऊ लागला असल्यानेच प्रलंबित अहवालांमध्ये ग्रामीणचे प्रमाण थोडेसे कमी झाले आहे.