१०८ रुग्णवाहिकेने आठ महिन्यांत ३१ हजार लोकांना दिले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:14+5:302020-12-11T04:41:14+5:30
फेब्रुवारीअखेरपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगावमधून एका कोरोनाबाधित युवकाला उपचारासाठी पहिल्यांदा २९ मार्च ...
फेब्रुवारीअखेरपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगावमधून एका कोरोनाबाधित युवकाला उपचारासाठी पहिल्यांदा २९ मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळावे, यासाठी राज्य शासनाकडून विनाशुल्क ‘१०८’ या टोल-फ्री क्रमांकाद्वारे रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेत सर्व अत्यावश्यक सोयी-सुविधांसह डॉक्टरदेखील नियुक्त आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेत चालकासह (पायलट) एक डॉक्टर कर्तव्यावर असतो. कोरोनाकाळात या रुग्णवाहिकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला; मात्र रुग्णवाहिकांच्या चालकांनी न थकता, न हार मानता ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानत आपले कर्तव्य चोखपणे बजावले.
---इन्फो--
डॉक्टर, चालकांना पुरेशा सुविधा
१०८ रुग्णवाहिकांच्या डॉक्टर, चालकांना संबंधित कंपनीमार्फत अत्यावश्यक सोयीसुविधा व साधने पुरेशा प्रमाणात पुरविली गेल्याचा दावा संबंधित अधिकारी वर्गाने केला आहे. कोरोनाकाळात ज्या रुग्रवाहिका कोविडसाठी धावत आहेत, त्या रुग्णवाहिकांवरील डॉक्टर, चालकांना पीपीई सुट, मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज आदि साधने मुबलक प्रमाणात पुरविली गेली, तसेच रुग्णाला कोविड सेंटरपर्यंत पोहोचविल्यानंतर संपूर्ण रुग्णवाहिका सॅनिटाईज करून घेतली जात होती. वाहनांचे किलोमीटर अधिक झाल्यामुळे वाहनांची देखभाल दुरुस्तीचा भार अधिक आला आणि वाहनांची अवस्था काहीशी खराब झाली. मोठा तांत्रिक बिघाड होऊन रुग्णवाहिका कधीही व कोठेही खोळंबली नाही.
--इन्फो--
महिरावणी येथून सप्टेंबर महिन्यात एका ३८ वर्षीय कोरोनाबाधित युवकाला संध्याकाळी क्वारन्टिन सेंटरमधून रेस्क्यू केले; कारण त्याच्या शरिरातील ऑक्सिजनची मात्रा वेगाने घसरत होती. त्याला वेळेत रुग्णालयात दाखल करण्याचे आव्हान होते. ‘कॉल’ होताच मी ६८ वर्षीय डॉ. राधेश्याम बिर्ला यांच्यासोबत रुग्णवाहिकेने महिरावणी गाठले. तेथून त्या युवकाला तत्काळ रुग्णवाहिकेत घेतले. बिर्ला यांनी त्याला ऑक्सिजन लावले आणि अवघ्या वीस मिनिटांत देवळाली कॅम्प येथील छावणी रुग्णालयात आम्ही रुग्णाला पोहचविले, त्याचे प्राण वाचल्यानंतर नातेवाइकांनी आभार मानले असता, मनाला खूप समाधान वाटले, असा अनुभव रुग्णवाहिकाचालक जुबेर पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.
---कोट---
अनुभव खूपच वेगळा राहिला. डॉक्टर आणि चालक हेच रुग्णांचे नातेवाईक बनले होते. रुग्णांच्या नातेवाइकांसोबत आम्ही फोनवर संपर्क साधत होतो. लॉकडाऊन काळात वाहतूक व्यवस्था बंद होती. यामुळे बरे झालेल्या हजारो रुग्णांना घरपोच सोडले. चालकांचे वेळोवेळी समुपदेशन दिले, यासोबतच त्यांना रुग्णवाहिका कशा पद्धतीने सॅनिटायझेशन करायची, याचेही प्रशिक्षण दिले. कोरोना काळात रुग्णसेवा करताना केवळ ५ डॉक्टर व ६ चालकांना कोरोनाची बाधा झाली होती व ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.
- डॉ. अभय सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक, नाशिक.
--
डमी आर वर १०ॲम्ब्युलन्स नावाने सेव्ह