खादगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; आत्महत्येची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 01:53 AM2022-06-18T01:53:33+5:302022-06-18T01:53:55+5:30
नांदगाव तालुक्यातील खादगाव येथे दहावीच्या परीक्षेत एका गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जनावरांना पाणी देत असताना विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे चर्चेला उधाण आले होते.
मनमाड : शहरापासून जवळ असलेल्या नांदगाव तालुक्यातील खादगाव येथे दहावीच्या परीक्षेत एका गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जनावरांना पाणी देत असताना विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे चर्चेला उधाण आले होते.
खादगाव येथे सकाळी जनावरांसाठी पाणी देण्यासाठी गेलेल्या सचिन लक्ष्मण ढेकळे (वय १६) याचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली. घरातून निघालेल्या सचिनने घरातील व्यक्तींना काहीही सांगितले नव्हते. मात्र, दहावीचा निकाल जाहीर होऊन त्यात सचिन अनुत्तीर्ण झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
मनमाडच्या न्यू छत्रे हायस्कूलमध्ये शिकत असलेला सचिन केवळ इंग्लिश विषयात एक मार्क कमी मिळाल्याने नापास झाला. दुपारी १.३० वाजेला तो शौचाला चाललो असे सांगून घराबाहेर पडला. बराच वेळ तो परत न आल्याने शोध घेतला असता एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.