सातपूर परिसरातील ११ गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 01:21 AM2020-09-22T01:21:08+5:302020-09-22T01:21:34+5:30
वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी सातपूर पोलिसांनी तब्बल रेकॉर्डवरील ११ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने तडीपारीची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
सातपूर : वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी सातपूर पोलिसांनी तब्बल रेकॉर्डवरील ११ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने तडीपारीची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांची यादी तयार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्याकडे पाठविण्यात आली होती. १२ पैकी ईश्वर नामदेव परदेशी (वय ५६, रा. श्रमिकनगर), राहुल दशरथ नरवाळ (२१, रा. प्रगती शाळेजवळ, अशोकनगर), रौफ मुश्ताक सय्यद (५०,रा. नाशिक), पप्पू श्रावण कोरडे (३२, रा. प्रबुद्धनगर सातपूर), प्रशांत उद्धव भोसले (४१, रा. प्रबुद्धनगर सातपूर), सुमित सुदर्शन त्रिभुवन (२०, स्वारबाबानगर सातपूर), विकास ऊर्फ विकी शरद निकम (२१, श्रमिकनगर), दर्शन मनोज डुगजल (२२, मटण मार्केट, सातपूर), रवींद्र गुलाब शार्दुल (२२, रा. स्वारबाबानगर, सातपूर), कृष्णा प्रकाश वाळके (२५, रा. प्र्रबुद्धनगर सातपूर), राहुल महादू मोरे (२८, अशोकनगर) या ११ गुन्हेगारांना किमान सहा महिने ते दोन वर्षांसाठी तडीपार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
तसेच यापूर्वी तडीपार केलेल्या परंतु शहरात आढळून आलेल्या प्रशांत उद्धव भोसले, रा.प्रबुद्धनगर यास ताब्यात घेण्यात आले आहे.