कांदा चाळींसाठी अकरा कोटींचे अनुदान
By admin | Published: March 7, 2017 02:28 AM2017-03-07T02:28:08+5:302017-03-07T02:28:26+5:30
सटाणा : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले कांदा चाळ अनुदान शासनाने नुकतेच मंजूर केले. नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे अकरा कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.
सटाणा : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले कांदा चाळ अनुदान शासनाने नुकतेच मंजूर केले. नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे अकरा कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान कृषी विभागाला प्राप्त झाले असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.
राज्याच्या सुमारे साठ टक्के उन्हाळ कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकविला जातो. मात्र कांदा काढल्यानंतर मालाला भाव मिळत नसल्यामुळे व ग्राहकांनाही कांद्याचा तुटवडा होऊ नये म्हणून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळी उभारण्यासाठी प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०१४-१५ या वर्षी कांदा चाळ उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. मात्र कांदा चाळी उभारूनही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनेही छेडली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेऊन सदर प्रश्न शासन दरबारी मांडल्याने जिल्ह्यासाठी अकरा कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीद्वारे दिली.(वार्ताहर)