अंबड वसाहतीत ११ कोटींची कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:01 AM2018-07-12T00:01:26+5:302018-07-12T00:01:48+5:30

अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

11 crore works in Ambad colonies approved | अंबड वसाहतीत ११ कोटींची कामे मंजूर

अंबड वसाहतीत ११ कोटींची कामे मंजूर

Next

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणार असल्याने उद्योजकांनी महापालिकेच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात समस्या असून, याबाबत महापालिकेला निवेदन तसेच पत्रव्यवहार करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. मनपाकडून कायम निधीची कमतरता असल्याचे कारण सांगण्यात येते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन (आयमा) या संघटनेच्या वतीने अंबड औद्यागिक वसाहतीतील अंतर्गत व मुख्य रस्त्यांची झालेल्या दयनीय अवस्था झाल्याने येथील खडीकरण व डांबरीकरण करावे तसेच मलनिस्सारणाची व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांसाठी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले होते. यास आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर वसाहतीतील रस्ते चकाचक होणार असल्याने उद्योजकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
उद्योजकांमध्ये समाधान
गेल्या अनेक वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. याबरोबरच मलनिस्सारणाचीदेखील समस्या कायमची असून, यासाठी आयमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आयुक्तांनी समस्या जाणून घेत यासाठी भरीव निधी देण्याची तयारी दर्शविली, ही उद्योजकांसाठी समाधानाची बाब आहे. याआधी मनपाने उद्योजकांच्या मागण्यांकडे पाहिजे तसे लक्ष दिले नव्हते; परंतु आता औद्योगिक वसाहतीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
- वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा

Web Title: 11 crore works in Ambad colonies approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.