११ सुशिक्षित बेरोजगारांना बुडालेले ३७ लाख पुन्हा मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 08:00 PM2020-12-17T20:00:09+5:302020-12-17T20:03:38+5:30

उर्वरित फसवणूक करणाऱ्यांनी १५ लाख ५७ हजार रुपये परत करण्याची तयारी दर्शवली आहे. फसवणूकीचा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

11 educated unemployed got Rs 37 lakh drowned | ११ सुशिक्षित बेरोजगारांना बुडालेले ३७ लाख पुन्हा मिळाले

११ सुशिक्षित बेरोजगारांना बुडालेले ३७ लाख पुन्हा मिळाले

Next
ठळक मुद्देसुशिक्षीत बेरोजगार युवकांना दिलासा नोकरीचे आमीष दाखवून घातला होता गंडा

नाशिक : परिक्षेत्रातील सुमारे ३९ सुशिक्षित बेरोजगारांकडून सुमारे २ कोटी ३८ लाख ९० हजार १०० रुपयांची फसवणुक झाल्याची तक्रार पाच जिल्ह्यांतील पोलिसांकडे प्राप्त झाली होती. या तक्रारींची दखल घेत आतापर्यंत ११ सुशिक्षित बेरोजगारांना बुडालेली एकुण ३७ लाख ३८ हजारांची रक्कम पुन्हा मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.

नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार उत्तर महाराष्ट्रातील ३९ सुशिक्षीत बेरोजगारांनी केली होती. यामध्ये सर्वाधिक २२ तक्रारी नाशिक ग्रामिणमधून धुळ्यातुन ११, नंदुरबारमधून ४ तरअहमदनगर, जळगावमधून प्रत्येकी १ याप्रमाणे तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी १६ तर अहमदनगरमध्ये ६, धुण्यात ३ जळगावात १ आणि नंदुरबारमध्ये ४ असे ३० गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी तक्रारदार व फसवणूक करणाऱ्यांमध्ये तडजोड झाली आहे. तसेच ११ जणांनी ३७ लाख ३८ हजार रुपये संबंधित बेरोजगार युवकांना परत केले. तसेच उर्वरित फसवणूक करणाऱ्यांनी १५ लाख ५७ हजार रुपये परत करण्याची तयारी दर्शवली आहे. फसवणूकीचा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
--
शेतकरी व सुशिक्षीत बेरोजगार युवकांची कोणी विविध आमीषांपोटी फसवणूक करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. कारण शेतकऱ्यांचे कष्ट अनमोल आहे. त्यामुळे त्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना नक्कीच शिक्षा होईल. अशाप्रमारे जर कोणाची फसवणुक पाच जिल्ह्यांत झाली असल्यास त्यांनी जवळच्यां पोलीस ठाण्यात तक्रार करावी. फसवणूक करणारे संघटीतरित्या गुन्हे करीत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई प्रस्तावित केली आहे. तसेच काहींच्या शोधासाठी पोलीस पथके आहेत.
-डॉ. प्रताप दिघावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक

Web Title: 11 educated unemployed got Rs 37 lakh drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.