मतदानासाठी ११ पुरावे ग्राह्य धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:11 AM2019-03-10T00:11:31+5:302019-03-10T00:11:52+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक मतदान ओळखपत्र नसल्यास इतर ११ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

11 EVMs will be valid for voting | मतदानासाठी ११ पुरावे ग्राह्य धरणार

मतदानासाठी ११ पुरावे ग्राह्य धरणार

Next

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक मतदान ओळखपत्र नसल्यास इतर ११ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. ओळखपत्र नसल्यास इतर अकरा पुराव्यांपैकी एक सादर करावे लागणार आहे. यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन/ राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खासगी कंपन्या अथवा कारखाने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, जनगणना आयुक्त यांनी दिलेले ओळखपत्र, रोजगार
हमी योजनेमधील जॉब कार्ड, कामगार मंत्रालय यांचेकडील आरोग्य कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन पेमेंट आॅर्डर, आमदार/ खासदार यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांपैकी एक कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.
यापूर्वी आधार कार्ड व्यतिरिक्त १७ पुरावे ग्राह्य धरण्यात येत होते. येत्या लोकसभा निवडणुकीत मात्र वरील ११ पैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करता येईल. पूर्वीप्रमाणे मालमत्तेबाबतची कागदपत्रे, शस्त्रास्त्र परवाना, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा/ अवलंबिता प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र व रेल्वे पासचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

Web Title: 11 EVMs will be valid for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.