पेट्रोलपंप कर्मचाऱ्याच्या साथीने ११ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:17 AM2019-06-21T01:17:20+5:302019-06-21T01:18:26+5:30
उंटवाडी येथील एका पेट्रोलपंपावर कर्मचाºयाच्या साथीने एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने त्यांच्याकडील वाहनांमध्ये डिझेल भरून घेत तब्बल ११ लाख ४१ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक सखाराम पुंडलिक महाजन यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको : उंटवाडी येथील एका पेट्रोलपंपावर कर्मचाºयाच्या साथीने एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने त्यांच्याकडील वाहनांमध्ये डिझेल भरून घेत तब्बल ११ लाख ४१ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक सखाराम पुंडलिक महाजन यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, उंटवाडी येथे असलेल्या गायत्री पेट्रोलपंपावर साक्षी टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे मालक बापू परशराम शिंदे यांनी पेट्रोलपंपावरील सहायक व्यवस्थापक लुबानसिंग भरतसिंग ठोके व वाहनांमध्ये पेट्रोल व डिझेल टाकणाºया तिघा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पेट्रोलपंपावरून ११ लाख ४१ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. यातील संशयित बापू श्ािंदे यांनी पेट्रोलपंपावरील लुबानसिंग ठोके व कर्मचाºयांचा विश्वास संपादन करून १९ सप्टेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या पाच महिन्यांच्या कालावधीत ११ लाख ४१ हजार रुपयांचा अपहार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बापू परशराम शिंदे तसेच लुबानसिंग ठोके यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.