नाशिकरोड परिसरातील ११ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

By admin | Published: November 18, 2016 12:07 AM2016-11-18T00:07:08+5:302016-11-18T00:04:42+5:30

महापालिका : आजही होणार कारवाई

11 religious places in Nashik Road area collapsed | नाशिकरोड परिसरातील ११ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

नाशिकरोड परिसरातील ११ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

Next

नाशिकरोड : परिसरातील विविध ठिकाणी अनधिकृत ११ धार्मिक स्थळे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकांकडून गुरुवारी सकाळी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. अनुराधा टॉकीज, दत्तमंदिररोड गाडेकर मळा, रोकडोबा वाडी, जयभवानी रोड साम्राज्य सोसायटी, फर्नांडीसवाडी, लोणकर मळा, दत्तमंदिररोड मनपा शाळा क्र. १२५, गुरुद्वारासमोर एलआयजी कॉर्नर, जेलरोड मोनिक सोसायटी, सानेगुरुजीनगर महाजन हॉस्पिटल, इंगळेनगर पाण्याची टाकी या ठिकाणची धार्मिक स्थळे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली.
बहुतेक ठिकाणी धार्मिक स्थळांचे कामकाज पाहणारे व भाविकांनी स्वत:हून मूर्ती व इतर साहित्य काढून घेतले होते. काही ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकासोबत असलेल्या पुजाऱ्याने मूर्ती काढण्यापूर्वी पूजा करून ती मूर्ती काढल्यानंतर धार्मिक स्थळ पाडण्यात आले.
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर, कर्मचारी यांनी सदर मोहीम राबविली. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)

Web Title: 11 religious places in Nashik Road area collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.