दोन एकत्र कुटुंबांसह ११ महिलांचा गौरव
By admin | Published: March 9, 2017 01:01 AM2017-03-09T01:01:46+5:302017-03-09T01:01:58+5:30
नामपूर : येथील उन्नती संस्थेच्या अलई विद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाद्वारे स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला
नामपूर : येथील उन्नती संस्थेच्या अलई विद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाद्वारे स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपसरपंच मंगला सावंत होत्या.
याप्रसंगी समाजातील ११ ज्येष्ठ महिलांसह एकत्र कुटुंबपद्धतीचा आदर्श संदेश देणाऱ्या दोन कुटुंबांचा गौरव करण्यात आला. तसेच आदिवासी वस्तीतील महिलांचा साडी-चोळी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी स्त्रीभ्रूण हत्त्या याविषयी नाटिका सादर केली.
विद्यार्थिनी रिया खरोटे व सेजल भामरे, पूजा झेंडे, मानसी बच्छाव यांनी स्त्रीभ्रूण हत्त्या व मुलींचे होणारे कमी प्रमाण यावर नाटिका सादर
केली. सरपंच सोनाली निकम यांनी साक्षरत’चे महत्त्व पटवून दिले. पंचायत समिती सदस्य कल्पना सावंत व ग्रामपंचायत सदस्य कविता सावंत यांनी विद्यार्थिनी व उपस्थित महिलांना सक्षम व धाडसी बनून आपल्या कुटुंबाला सुशिक्षित करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर यांनी महिलांचे कुटुंबातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. विद्यालयातर्फे आई-जिजाऊ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात ४५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यासह रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली.
या स्पर्धेत सहा विद्यार्थिनींनी बक्षिसे मिळविली, तर रांगोळी स्पर्धेत ३ मुलींच्या रांगोळ्या लक्षवेधक होत्या. करुणा अलई, मंगला सावंत, सरपंच सोनाली निकम, कल्पना सावंत, कविता सावंत, स्नेहलता नेरकर, नूतन पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (वार्ताहर)