११० किलो लसूण अन् बटाट्यांचा माल चाेरट्यांकडून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:12 AM2020-12-08T04:12:47+5:302020-12-08T04:12:47+5:30
अशोकनगर भाजी मार्केटमधील भाजीपाला विक्रेते मनोज सांगळे यांनी रविवारी रात्री ९ वाजता दुकान बंद करून भाजीपाला नेहमीप्रमाणे ओट्यावर ठेवून ...
अशोकनगर भाजी मार्केटमधील भाजीपाला विक्रेते मनोज सांगळे यांनी रविवारी रात्री ९ वाजता दुकान बंद करून भाजीपाला नेहमीप्रमाणे ओट्यावर ठेवून घरी परतले. सोमवारी (दि.७) सकाळी ते आपल्या दुकानात आले असता त्यांनी ओट्यावर ठेवलेला शेतमाल चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी विक्रीसाठी आणलेला ५५ किलो लसूण व ५५ किलो बटाटे, ६ पॅकेट मिर्ची असा अंदाजे तीस हजार रुपयांचा भाजीपाला चोरट्यांनी लंपास केला आहे. तसेच बेबीबाई शिंदे यांच्या दुकानातून ५५ किलो बटाटे, ३० किलो लसूण असा अंदाजे दहा हजार रुपयांचा माल चोरी केला. लॉकडाऊननंतर बेरोजगारी वाढली असल्याने चोरांनी आपला मोर्चा आता भाजीबाजाराकडे वळविला आहे. दोन महिन्यांपूर्वी भुरट्या चोरांनी जाधव संकुल येथील एका किराणा दुकानातुन मिठाच्या पाच गोण्याही लांबविल्याची घटना घडली होती. दरम्यान, सातपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-----