महापालिकेच्या ‘अ‍ॅप’वर  पंधरा दिवसांत ११०० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:44 AM2018-03-17T00:44:40+5:302018-03-17T00:44:40+5:30

महापालिकेने यापूर्वीच्या ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅपला गुडबाय करत नव्याने तयार केलेल्या ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नवीन अ‍ॅपवर १५ दिवसांत ११०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित आहेत. ११०९ पैकी ८५१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपबाबत ६९ टक्के नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

1100 complaints in 15 days on municipal 'app' | महापालिकेच्या ‘अ‍ॅप’वर  पंधरा दिवसांत ११०० तक्रारी

महापालिकेच्या ‘अ‍ॅप’वर  पंधरा दिवसांत ११०० तक्रारी

Next
ठळक मुद्दे‘स्मार्ट नाशिक’चे फिचर्स बंदअ‍ॅपबाबत ६९ टक्के लोकांनी तक्रार निवारणाबाबत समाधान व्यक्त केले११०९ तक्रारींमध्ये सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाच्या

नाशिक : महापालिकेने यापूर्वीच्या ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅपला गुडबाय करत नव्याने तयार केलेल्या ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नवीन अ‍ॅपवर १५ दिवसांत ११०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित आहेत. ११०९ पैकी ८५१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपबाबत ६९ टक्के नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  नाशिक शहराचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश होण्यासाठी २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘स्मार्ट नाशिक’ या अ‍ॅपची निर्मिती केली होती. सुमारे ५५ हजारहून अधिक नागरिकांनी हे अ‍ॅप डाउनलोड करून घेतले होते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ तक्रार निवारणासाठी सदर cघेतला. त्यानुसार, सुधारणा करत दि. १ मार्चपासून ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नावाने अ‍ॅप तयार करण्यात आले. सदर अ‍ॅपवर पंधरा दिवसांत ११०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यातील ८५१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. २५८ तक्रारी प्रलंबित आहेत. या अ‍ॅपबाबत ६९ टक्के लोकांनी तक्रार निवारणाबाबत समाधान व्यक्त केले आहे, तर १७ टक्के लोकांनी फिडबॅक दिला आहे. आतापर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांनी सदर अ‍ॅप डाउनलोड करून घेतले आहे. प्राप्त तक्रारींपैकी १२ तक्रारींचे निवारण सात दिवसांच्या आत न झाल्याने संबंधित खातेप्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ११०९ तक्रारींमध्ये सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाच्या आहेत. त्यापाठोपाठ अतिक्रमण १७८, रस्ते बांधकाम-१५३, अस्वच्छता-१४१, पाणीपुरवठा- १०५, उद्यान-७६, आरोग्य-७४, तर ड्रेनेज विभागाच्या ७० तक्रारींचा समावेश आहे.
‘स्मार्ट नाशिक’चे फिचर्स बंद
महापालिकेने नवीन ‘एनएमसी ई-कनेक्ट’ हे अ‍ॅप सुरू केल्याने जुन्या असलेल्या ‘स्मार्ट नाशिक’अ‍ॅपचे सर्व फिचर्स येत्या रविवार (दि.१८)पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, नागरिकांना नवीन मोबाइल अ‍ॅपवर आपल्या तक्रारी मांडता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: 1100 complaints in 15 days on municipal 'app'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.