कळवण तालुक्यातील १११ गावे सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:35+5:302021-04-07T04:14:35+5:30

संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट असताना कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात कळवण तालुक्याच्या १११ गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आजमितीस नाही. सरपंच ...

111 villages in Kalvan taluka are safe | कळवण तालुक्यातील १११ गावे सुरक्षित

कळवण तालुक्यातील १११ गावे सुरक्षित

संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट असताना कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात कळवण तालुक्याच्या १११ गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आजमितीस नाही. सरपंच , उपसरपंच व सदस्यांसह ग्रामसेवक यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून गावात शासनाच्या नियमांचे पालन करून मास्क व सॅनिटायझरचा वापर केला, गावात वेळोवेळी धुरळणी व फवारणीदेखील करण्यात ग्रामस्थ यशस्वी झाले.कोरोना काळात गावात बाहेरच्या नागरिकांना प्रवेश बंद केला शिवाय आणि आठवडे बाजाराला मज्जाव केला, कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या व लॉकडाऊनमुळे गावात परतलेल्या रुग्णांची तपासणी करून ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन केले.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात १११ गावात आजमितीस कोरोनाचा रुग्ण नाही. या गावांमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. कोरोना रोखण्याबाबतच्या निर्देशांचे काटेकाेर पालन करण्यात आल्याने कोरोनाचे संक्रमण झालेले नाही. या गावातील नागरिकांनी विशेष प्रयत्न करुन कोरोना संक्रमण रोखले आहे. आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पंचायत समिती प्रशासन आणि संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,दक्ष गावकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांमुळे कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. या गावांमध्ये आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. कोरोना रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनजागृती केली. ४१ गावात बाधित रुग्ण

कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, कनाशी, नवीबेज, मानूर, सप्तश्रृंगी गड, नांदुरी,मोकभणगी, रवळजी, शिरसमणी, कळवण खुर्द,पाटविहीर, पाळे बु, देवळी वणी, तिऱ्हळ खुर्द, खेडगाव, कातळगाव,पाळे पिंप्री, दळवट, भेंडी, भुसणी, जयपूर, आठंबे, निवाणे, हिंगवे, जयदर, वडाळा,निरगुडपाडा,चणकापूर, बिजोरे,पळसदर, सरलेदिगर,भादवन, पाळे खुर्द,देसराणे, जुनीबेज,गोपाळखडी, नाकोडे,बगडू या गावामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन या गावांमध्ये आज ४०९ रुग्ण कोरोना बाधित आहेत. कोट... कोरोनाच्या काळात ग्रामस्थांनी बाहेरगावी लग्नसमारंभ व अंत्यविधीच्या कार्यक्रमास जाणेही टाळले. गावात अंत्यसंस्काराच्या वेळी आपसात सुरक्षित अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझरचा वापर करत खडकी जयदर ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन केले होते. या सर्व बाबींमुळेच गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.

- ललिता राजू खांडवी,

सरपंच खडकी जयदर

नियमांचे काटेकोर पालन

९५२ लोकसंख्या असलेल्या खडकी जयदर गावात नातेवाईकांव्यतिरिक्त बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे.गावातील नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेरगावी जातात;मात्र आपसात सुरक्षित अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत असल्यामुळे गावात कोरोनाची लागण झाली नाही. मनात कोरोनाची भीती आहे. मात्र शासनाच्या नियमांचे पालन करत ग्रामस्थांनी सतर्कता बाळगली म्हणूनच गावात कोरोनाची एन्ट्री झाली नाही .

- मीना भोये,

ग्रामसेविका, खडकी जयदर

===Photopath===

050421\241805nsk_31_05042021_13.jpg~050421\241805nsk_32_05042021_13.jpg

===Caption===

मीना भोये~ललिता खांडवी

Web Title: 111 villages in Kalvan taluka are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.