त्र्यंबकेश्वर मंदिरावर आता राहाणार ११४ कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 09:30 PM2020-07-16T21:30:39+5:302020-07-17T00:03:53+5:30

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकराजाच्या मंदिरावर आता ११४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.

114 cameras will now be watching the Trimbakeshwar temple | त्र्यंबकेश्वर मंदिरावर आता राहाणार ११४ कॅमेऱ्यांची नजर

त्र्यंबकेश्वर मंदिरावर आता राहाणार ११४ कॅमेऱ्यांची नजर

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकराजाच्या मंदिरावर आता ११४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. भारतीय पुरातत्व विभागाच्या अख्त्यारित असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी महाराष्टÑाच्या गृहविभागाकडून पत्रव्यवहार तसेच बैठकांमध्ये देवालयाच्या सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यापूर्वी त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे ४० सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत. आता नव्याने ७४ कॅमेरे खरेदी करून केवळ त्र्यंबकेश्वर देवालयच नाही तर या कॅमेºयांमध्ये शिवनेरी धर्मशाळा, शिवाजी पुतळा परिसर ते लक्ष्मीनारायण चौक वगैरे परिसर कक्षेत येणार आहे. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्वयंभू ज्योतिर्लिंग असून, सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान आहे. गोदावरीचे उगमस्थान असून, येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. या शहराला धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. या मंदिराचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच येथे बाराही महिने भाविकांचा राबता असतो. पावसाळ्यात श्रावण महिन्यात येथील सृष्टीसौंदर्य खुलत असते.
..श्रावणाची तयारी
त्र्यंबकेश्वर देवस्थानने जवळपास सहा महिन्यांपूर्वीच लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वीच सीसीटीव्ही खरेदी करण्याची प्रक्रि या पूर्ण केली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे कॅमेरे जवळपास २५ लाख रु पये खर्च करून खरेदी केले असून, लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने गर्दी नसली तरी यापूर्वीही व जेव्हा केव्हा अनलॉक होईल तेव्हा गर्दी होण्याची शक्यता आहे़ मंदिराच्या सुरक्षेवर या कॅमेºयांद्वारे बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. मंगळवारपासून सणांचा, व्रतवैकल्याचा महिना सुरू होत आहे. खास श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर हे कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. अजून सर्व कॅमेरे बसवण्यात आलेले नाही. मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम बंद होते.

Web Title: 114 cameras will now be watching the Trimbakeshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक