पाच वर्षांत ११४ मुले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:54+5:302021-02-24T04:15:54+5:30
नाशिक : ‘मुलगा वंशाचा दिवा’ या म्हणीप्रमाणे पूर्वी मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते, परंतु सध्या हा समज मागे ...
नाशिक : ‘मुलगा वंशाचा दिवा’ या म्हणीप्रमाणे पूर्वी मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते, परंतु सध्या हा समज मागे पडत चालला असून, मूल नसलेल्या दाम्पत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातील आधार आश्रमातून बालके दत्तक घेण्याच्या प्रमाणातून ही बाब अधोरेखित झाली आहेे
नाशिकमधील अनाथ आश्रमातून गेल्या पाच व मुले दत्तक घेण्याचा प्रकार शेकडो वर्षांंपासून सुरू आहे. पूर्वी यात प्रामुख्याने मुलांचाच समावेश अधिक असायचा. संपत्ती आहे, परंतु वारस नाही. त्यामुळे आपला वारसा चालत राहावा, हा यामागे हेतू होता. गेल्या काही दिवसांपासून मूल दत्तक घेण्याच्या विचारातही बदल घडून येत आहे. एक मूल असताना दुसरे मूल दत्तक घेतले जात आहे. मुलगा असेल तर मुलगी आणि मुलगी असेल तर मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढत आहेत, असे असले तरी ज्या दाम्पत्यांना मुलंच होत नाही. अशा दाम्पत्यांना मुले दत्तक देण्यास अनाथालयांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते आहे.
इन्फो
मुली दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक
मुली सर्वच बाबतीत आघाडीवर आहेत. मुलगी आणि मुलगा, असा भेदही कमी झाला आहे. त्यामुळे दत्तक घेणारे दाम्पत्य आधी मुलीचीच मागणी करतात. नाशिकमधील आधार आश्रमातून गेल्या पाच वर्षांत ६९ मुली व ४५ मुले दत्त दिली गेली आहेत. मुलगा किंवा मुलगी दत्तक देताना आयकर भरणाऱ्या दाम्पत्यांनाच पहिली पसंती दिली जाते. समाजाचीही मुलींच्या बाबतीतली मानसिकता बदलली आहे. ‘मुलगाच हवा’ हा हट्ट मागे पडला आहे. मुलगाच हवा, असे म्हणणारे दाम्पत्यही येतात, परंतु त्यांची संख्या फारच कमी असते.
इन्फो-
अनेकजण वेटिंगवर
मूल दत्तक घेण्यासाठी उत्सुक असून, अनेकजण वेटिंगवर असतात. परंतु , कायदेशीर प्रक्रिया आणि मूल दत्तक घेण्याची पात्रता प्राप्त केल्याशिवाय मूल दत्तक दिले जात नाही. त्यासाठी केंद्रीय स्तरावरून ‘कारा’ संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीनंतर अनाथालयांकडून संबंधित दाम्पत्यांच्या माहितीची खातरजमा करून मूल दत्तक दिले जाते.
कोट-
मूल दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याला त्याचे मेडिकल फिटनेस, ओळखीचे व निवासाचे पुरावे, उत्पन्नाचे पुरावे, वयाचे पुरावे यासोबत विवाहाचा पुरावा यासारखे महत्त्वाचे कागदपत्र ‘कारा’ संकेतस्थळावर अपलोड करून नोंदणी करावी लागते. या कागदपत्राची पडताळणी करून संबधित दाम्पत्याला मूल दत्तक देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
राहूल जाधव , दत्तक समन्वयक, आधार आश्रम
वर्षनिहाय मूल दत्तक घेतलेल्या मातापित्यांचा आढावा
२०१६-१७ -२०
२०१७-१८ - २४
२०१८-१९ - २३
२०१९-२० - २८
२०२०-२१ - १९
देशांतर्गत ३६ मुले, ५९ मुली
परदेशात १९-९ मुले १० मुली
२०१९-२० मध्ये सर्वाधिक २८ बालके घेतली दत्तक