११५ कुटुंबांना सदनिकांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:41 PM2018-10-03T22:41:02+5:302018-10-03T22:42:11+5:30

मालेगाव : शहरातील राहुलनगर व कालिकुट्टी भागातील झोपडपट्टी-धारकांपैकी ११५ पात्र कुटुंबीयांना सदनिकांचा ताबा बुधवारी देण्यात आला. टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थींचे स्थलांतरण करून त्यांना सदनिकांचे वाटप केले जाणार आहे.

115 families have control over the tenements | ११५ कुटुंबांना सदनिकांचा ताबा

११५ कुटुंबांना सदनिकांचा ताबा

googlenewsNext
ठळक मुद्देपात्र लाभार्थींची स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली

मालेगाव : शहरातील राहुलनगर व कालिकुट्टी भागातील झोपडपट्टी-धारकांपैकी ११५ पात्र कुटुंबीयांना सदनिकांचा ताबा बुधवारी देण्यात आला. टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थींचे स्थलांतरण करून त्यांना सदनिकांचे वाटप केले जाणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून शहरालगतच्या म्हाळदे येथे अतिक्रमणधारक झोपडपट्टी-धारकांसाठी घरकुल योजनेचे काम सुरू होते. या घरकुल योजनेत ११०० घरकुले तयार झाली आहेत. शहरातील कालिकुट्टी व राहुलनगर भागातील लाभार्थींनी महापालिकेकडे घरकुलासाठी अर्ज दाखल केले होते. २८९ कुटुंबांनी अंशदान रक्कम भरली होती. बुधवारी या पात्र लाभार्थींची स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी ६४ व बुधवारी ५१ अशा ११५ कुटुंबांना सदनिकांचा ताबा देण्यात आला. गेल्या दोन दिवसात ७० पात्र लाभार्थींनी अंशदान (लाभार्थी हिस्सा) भरला आहे. येत्या आठवडाभर स्थलांतराची प्रक्रिया सुरू राहील. पात्र लाभार्थींची आर्थिक अडचणीबाबत मनपा मध्यवर्ती समिती निर्णय घेणार आहे. महापालिकेने स्थलांतरासाठी वाहने व कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती.

Web Title: 115 families have control over the tenements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.