‘कळसुबाई’वर फडकणार १२ फूट अन् ६३ मीटर लांबीचा तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:09 PM2018-08-14T22:09:03+5:302018-08-14T22:15:37+5:30
देशाचा तिरंगा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. बनसोडे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविला जाणार आहे.
नाशिक : महाराष्ट्रतील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील भंडारदरा येथील ‘कळसुबाई’ शिखरावर स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.१५) एव्हरेस्ट सर करणारा आदिवासी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्यांचे पथकाच्या प्रमुख उपस्थितीत सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकाविला जाणार असल्याची माहिती भंडारदरा पर्यटनाचे अध्यक्ष रवी ठोंबाडे यांनी दिली. यावेळी बनसोडे यांच्या हस्ते ‘भंडारदरा टुरिझम’च्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे.
देशाचा तिरंगा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. बनसोडे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविला जाणार आहे. या झेंड्याची उंची १२ फुट आणि लांबी ६३ मीटर असणार आहे, अशी माहिती विजया पाडेकर यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेत शेकडो लोक सामील होणार असून भारताच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब असणार आहे.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ‘360एक्सप्लोरर’च्या माध्यमातून जगभर मोहिमा करत असतात. बनसोडे यांनी जगातील ४खंडातील ४ सर्वोच्च शिखरांवर चढाई करून भारतासाठी अभिमानास्पद कामिगरी केली आहे. ते आपल्या टीमसोबत पहाटे पाच वाजता कळसूबाई शिखरावर चढाई सुरू करणार आहे. बनसोडे व ठोंबाडे यांनी अकोले तालुक्याचे निसर्गसौंदर्य अन् येथील गडकिल्ल्यांचे वैशिष्टय जगभर पोहचावे, यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. जेणेक रुन येथील आदिवासी बेरोजगार तरुणांना अधिकाधिक रोजगार मिळण्यास मदत होईल.