मालेगावी निर्बंधांची अंमलबजावणी साठी पोलीस व मनपाची संयुक्त १२ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 11:49 PM2021-04-06T23:49:07+5:302021-04-07T00:59:02+5:30

मालेगाव :- शासनाने लावलेल्या नविन निर्बंधा नुसार स्वतंत्र हॉटेल, रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप, उपहारगृह उघडणे ठेवता येणार नाही. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल सेवा देता येईल. तर विकएंड लॉकडाऊन दरम्यान केवळ घरपोच सेवा देता येईल निर्बंधांची अंमलबजावणी साठी पोलीस व मनपाची संयुक्त १२ पथके कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती महापलिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी ( दि. ६) पत्रकार परिषदेत दिली.

12 joint teams of police and corporation for implementation of Malegaon restrictions | मालेगावी निर्बंधांची अंमलबजावणी साठी पोलीस व मनपाची संयुक्त १२ पथके

मालेगावी निर्बंधांची अंमलबजावणी साठी पोलीस व मनपाची संयुक्त १२ पथके

Next
ठळक मुद्देमालेगाव शहरात ७६ प्रतिबंधित क्षेत्र

मालेगाव :- शासनाने लावलेल्या नविन निर्बंधा नुसार स्वतंत्र हॉटेल, रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप, उपहारगृह उघडणे ठेवता येणार नाही. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल सेवा देता येईल. तर विकएंड लॉकडाऊन दरम्यान केवळ घरपोच सेवा देता येईल निर्बंधांची अंमलबजावणी साठी पोलीस व मनपाची संयुक्त १२ पथके कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती महापलिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी ( दि. ६) पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेने केलेल्या उपाय योजनांचे स्पष्टीकरण देतांना कापडणीस म्हणाले की, पथके गर्दीवर नियंत्रण, मास्क न वापरणा-यांवर कारवाई, दुकाने बंद ठेवणे याबाबत ते कारवाई करतील. सध्या पालिकेकडे ३०० रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध आहेत. इंजेक्शन तुटवडा होऊ नये यासाठी इंजेक्शन उत्पादन कंपनीसोबत महापालिकेने करार केला असून ५ हजार इंजेक्शन मागणी केली आहे. आठवड्याभरात यातील १ हजार इंजेक्शन उपलब्ध होतील. एचआरसीटी केंद्रांवर करोना जलद चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयातील बिलांबाबत तक्रारीसाठी ऑडीटर नेमले आहेत. हज हाउस, दिलावर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. शहरात ७६ प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यात आले असून येथे बेरीकेटिंग केले जाईल.नागरिकांनी निर्बंधांचे पालन करून करोना साखळी तोडण्यात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.यावेळी उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, तुषार आहेर, वैभव लोंढे, उपस्थित होते.

Web Title: 12 joint teams of police and corporation for implementation of Malegaon restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.