फायनान्स कंपनीतून १२ लाखांची लूट

By Admin | Published: November 27, 2015 10:51 PM2015-11-27T22:51:09+5:302015-11-27T22:51:57+5:30

फायनान्स कंपनीतून १२ लाखांची लूट

12 lakh looted from the finance company | फायनान्स कंपनीतून १२ लाखांची लूट

फायनान्स कंपनीतून १२ लाखांची लूट

googlenewsNext

सिडको : येथील राणेनगर भागात असलेल्या एका फायनान्स कंपनीतील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने मित्राच्या मदतीने कंपनीच्या लॉकरमधील सुमारे १२ लाखांची रोकड लंपास केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोघा भामट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन चारचाकी गाड्या, महागडे मोबाइल व ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिडकोतील राणेनगर भागात इक्वि टॉस मायक्रो फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेत सचिन टेकाळे (२२, रा. रथचक्र सोसायटी, इंदिरानगर) हा कामाला होता. कार्यालय उघडण्याचे व बंद करण्याचे काम संशयित सचिन हा करीत होता. यामुळे साहजिकच कार्यालयाच्या चाव्यादेखील त्याच्याकडेच असत. कंपनीच्या लॉकरमध्ये १२ लाख रुपयांची रोकड असल्याचे सचिनला माहीत होते. सदरची रोकड लंपास करायची असा विचार सचिनच्या डोक्यात आला. यामुळे त्याने याबाबत त्याचा मित्र अतुल बापूराव निकम (२१, रा. फ्लोरा टाउन अंबड) यास सांगितले. अतुलनेही यास दुजोरा देत लॉकरमधील रोकड लंपास करण्याबाबत सचिनला होकार दिला. यानंतर हे दोघेही रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास कंपनीत आले व कंपनीच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या ओरिजिनल चाव्या घेऊन लॉकरमधील १२ लाख ६६ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
कंपनीच्या लॉकरमधून १२ लाखांची रोकड लंपास झाल्यानंतर सदरची चोरी ही कंपनीतील कर्मचाऱ्याकडूनच झाली असल्याचा अंदाज कंपनीच्या व्यवस्थापक सोनल साखळे यांना आला होता. त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, रोकड लंपास केल्यानंतर संशयित सचिन व अतुल या दोघांनी या पैशातून स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एमएच ०६-एटी ८०५५ व व्हेस्टा गाडी क्रमांक एमएच ०६-एडब्ल्यू-६५०७ या दोन चारचाकी गाड्या विकत घेतल्या. तसेच महागडे मोबाइलही घेऊन मौजमजा करण्यास सुरुवात केली. परंतु सातपूरच्या चाणाक्ष असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात आली.

Web Title: 12 lakh looted from the finance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.