१२ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू
By admin | Published: July 14, 2017 01:11 AM2017-07-14T01:11:58+5:302017-07-14T01:12:09+5:30
नाशिक : येथील गायकवाड सभागृहाजवळ हिरवेनगरमध्ये राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील गायकवाड सभागृहाजवळ हिरवेनगरमध्ये राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड सभागृहासमोर ‘बाग-ए-नर्गिस’ बंगल्यामध्ये काकाकडे चार वर्षांपासून राहणाऱ्या मोहम्मद आसीफ फय्याज सिद्दीकी (१२) हा सकाळी गुरुवारी (दि.१३) सकाळी अॅक्टिवा दुचाकी घेऊन निघाला. दरम्यान, पखालरोडने अशोका मार्गाकडे जात असताना रॉयल कॉलनीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडके त आसिफ गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मूळ उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेला आसिफ वडिलांच्या घराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे काकांकडे चार वर्षांपासून राहात होता. त्याच्या पश्चात वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.