१२० चालकांनी बजावली आंतरराज्य प्रवासी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:55 PM2020-06-02T21:55:10+5:302020-06-03T00:16:32+5:30
नाशिक : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर नेऊन सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी परराज्यापर्यंत दिलेली सेवा कोणत्याही जोखमीपेक्षा कमी नाही. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या काळात नाशिकमधील १२० चालकांनी केवळ मास्क आणि सॅनिटायझर इतक्याच सुरक्षिततेच्या साधनांवर ४७ हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर नेऊन सोडले. याबरोबरच पुणे, बीड, गोंदिया, ओरिसा, औरंगाबाद या ठिकाणीदेखील प्रवासी सोडण्याची जबाबदारी पार पाडली.
नाशिक : (संदीप भालेराव) परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यातील सीमारेषेवर नेऊन सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी परराज्यापर्यंत दिलेली सेवा कोणत्याही जोखमीपेक्षा कमी नाही. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या काळात नाशिकमधील १२० चालकांनी केवळ मास्क आणि सॅनिटायझर इतक्याच सुरक्षिततेच्या साधनांवर ४७ हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर नेऊन सोडले. याबरोबरच पुणे, बीड, गोंदिया, ओरिसा, औरंगाबाद या ठिकाणीदेखील प्रवासी सोडण्याची जबाबदारी पार पाडली.
कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनचा फटका मजुरांना बसला आणि रोजगार नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली. हजारो मजुरांची पायपीट सुरू झाल्यानंतर सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद असतानाही मजुरांची पायपीट होऊ नये यासाठी गेल्या ९ मेपासून परप्रांतीय मजुरांसाठी बसेस सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेऊन प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे एसटी महामंडळाने ही जाबाबदारी घेतली आणि परराज्यात जाण्यासाठी शंभर ते १२० चालक ‘कोविड योद्धे’ म्हणून तयार झाले.
मजुरांचे लोंढे रस्तोरस्ती दिसताच त्यांना बस उपलब्ध करून दिली जात होती. यावेळी मजुरांचे होणारे स्क्रिनिंग फारेसे अचूक होत असेल याची कोणतीही शाश्वती नसतानाही चालकांनी अशा प्रवाशांना घेऊन त्यांच्या राज्यात सोडले. नाशिक शहर, जिल्हा तसेच शेजारी ठाणे जिल्ह्यातून येणाऱ्या मजुरांची वाहतूक करण्याची जोखीम या चालकांनी पत्करली आणि ती यशस्वी पार पाडलीही. सुमारे १२० चालक, १० पर्यवेक्षक अधिकारी आणि दोन आगार व्यवस्थापक या कामी सातत्याने जागत होते. दिवसा आणि रात्री कधीही बसेसची मागणी होत असल्याने या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहावे लागले.
रेल्वेने जाणाºया श्रमिकांना रेल्वेस्थानकापंर्यत पोहोचविणे, पुण्याहून सुटणाºया तामिळनाडू रेल्वेसाठी नाशिकहून गेलेल्या २० गाड्या तसेच दिल्लीहून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी रात्रीतून सेवेत हजर झालेल्या चालकांची सर्वप्रकारची जोखीम पत्करून प्रवाशांना त्याच्या इच्छितस्थळी नेऊन सोडले.