जीएचएस मॅरेथॉनमध्ये धावले १२०० धावपटू आरोग्याचा संदेश : कैलास गायकवाड, सोमनाथ जाधव विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:40 AM2018-03-05T01:40:53+5:302018-03-05T01:40:53+5:30
नाशिकरोड : सामाजिक ऐक्य आणि स्वास्थ्याचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जीएचएस मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे १२०० धावपटू एकतेचा संदेश घेऊन धावले.
नाशिकरोड : सामाजिक ऐक्य आणि स्वास्थ्याचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जीएचएस मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे १२०० धावपटू एकतेचा संदेश घेऊन धावले. १० किलोमीटरमध्ये कैलास गायकवाड, पाच किलोमीटरमध्ये सोमनाथ जाधव तर तीन किलोमीटरमध्ये विशाल कदम विजेते ठरले. ७२ वर्षांच्या आजोबांचा सहभाग स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जीएचएस रन नावाने सुरू केलेला उपक्र म हा नाशिकचे सामाजिक स्वास्थ्य बळकट करेल, आरोग्यासाठी धावणे हा प्रकार नाशिकचा ब्रॅन्ड होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी केले. १०, ०५ आणि ०३ किमी या तीन विभागात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नाशिकमधील नामवंत उद्योजक, वकील, बिल्डर, पोलीस अधिकाºयांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. या रनमध्ये अनिरु द्ध अथनी, डॉक्टर श्वेता भिडे, तरु ण गुप्ता, रितू गोयल, मेजर डी. के. झरेकर, संदीप गोयल यांचे सहकार्य लागले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना राधाकृष्णन् बी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर के. जी. गुप्ता, ओमप्रकाश सोमानी, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, संदीप गोयल, नगरसेवक अनिल ताजनपुरे , तरु ण गुप्ता, रितू गोयल, डॉ. प्रदीप पवार, डॉ. श्वेता भिडे, मेजर डी. के. झरेकर उपस्थित होते.