१२ हजार मतदान यंत्रे होणार नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:09 AM2020-10-03T00:09:45+5:302020-10-03T01:03:47+5:30
नाशिक: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालबा' झालेली मतदान यंत्रे नष्ट करण्यासाठी संबंधित कंपनीकडे यंत्रे पाठविण्यात आली असून जिल्'ात वापरण्यात आलेली १२ हजार ७९५ मतदान यंत्रे संबंधित कंपनी नष्ट करणार आहे.
नाशिक: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालबा' झालेली मतदान यंत्रे नष्ट करण्यासाठी संबंधित कंपनीकडे यंत्रे पाठविण्यात आली असून जिल्'ात वापरण्यात आलेली १२ हजार ७९५ मतदान यंत्रे संबंधित कंपनी नष्ट करणार आहे.
मतदानप्रक्रियेत इव्हीएम मशीनचा वापर होत असल्याने अद्ययावत मतदान यंत्र निवडणुकीसाठी वापरली जात ैआहेत. निवडणुकीनंतर जिल्'ात वापरलेली मतदान यंत्रे ही सुरक्षित केली जातात. निवडणूक आयंोगाने दिलेल्या आदेशानंतर २००६ पुर्वी निवडणुकीत वापरण्यात आलेली एम-वन प्रकारातील मतदाने यंत्रे आता कालबा' झाल्याने अशी सर्व यंत्रे नष्ट करण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार नाशिक जिल्'ातून अशा प्रकारची १२, ७१५ मतदान यंत्रे संबंधित कंपनीकडे रवाना करण्यात आली.
नुकत्याच झालेली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अद्यायावत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात आली होती. सुरक्षिततेच्यादृष्टीने ही अद्ययावत मतदान यंत्रे मानली जातात. त्यामुळे जे जुने मतदान यंत्रे होती ती कालबा' झाल्याने अशी यंत्रे संबंधित कंपनीकडे परत पाठविण्यात येत आहेत. जिल्'ात अलिकडच्या काळात कोणत्याही निवडणुका नसल्याने ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी आयोगाने निवडूक अधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना केल्या होत्या.
मेरी येथील गुदामात ठेवलेल्या या यंत्रांची फेरतपासणी मागील आठवडाभरापासून निवडणूक विभागाकडून सुरु होती. कालबा' झालेली १२ हजार ७९५ मतदान यंत्र ट्रकमध्ये लोंडींग करण्याचे काम सुरु आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉपोर्रेशन आॅफ इंडिया लिमीटेड, या कंपनीचे ५ हजार ९५२ बॅलेट युनीट आणि ६ हजार २७३ इतके कंट्रोल युनिट नष्ट क?ण्यासाठी पाठविले जाणार आहेत. तर पुण्यातील बेल कंपनीचे ५७० बॅलेट युनिट पाविण्यात येणार आहे.
एस.टीच्या ट्रकचा वापर
आंध्र प्रदेशातील एका कंपनीने तयार केलेली ही यंत्रे आता पुन्हा संबंधित कंपनीकडे पाठविली जात आहेत. त्यासाठी निवडणूक शाखेने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या १३ ट्रक्स वाहतुकीसाठी करारबद्ध केल्या आहेत. या बसच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमध्ये यंत्रे घेऊन बसेस रवाना झाल्या.