124 वाहनचालक पोलिस उमेदवार रविवारी सोडविणार पेपर; ग्रामिण पोलिस दलातील 15 जागांसाठी लागणार बुद्धिमत्तेची कसोटी
By अझहर शेख | Published: March 25, 2023 05:45 PM2023-03-25T17:45:34+5:302023-03-25T17:45:45+5:30
: दडपशाही केंद्र सरकारने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदार सदस्यत्व रद्द केले.
नाशिक : नाशिक ग्रामिण पोलिस दलातील पोलिस वाहनचालक पदाच्या पंधरा रिक्त जागांसाठी मैदानी चाचणीअंती पात्र ठरलेल्या १२४ भावी पोलिस वाहनचालक उमेदवारांची रविवारी (दि.२६) लेखी चाचणी परिक्षा घेतली जाणार आहे. यासाठी नाशिक ग्रामिण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून चोख व्यवस्था व नियोजन करण्यात आले आहे.
पोलिस भरतीअंतर्गत राज्यभरात एकाच वेळी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पोलिस दलाने चोख नियोजन केले आहे. सीसीटीव्हींसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या रिक्त पदांच्या तुलनेत उमेदवार जास्त असल्याने स्पर्धा निर्माण होताना दिसत आहे. एका रिक्त जागेसाठी किमान दहा उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. यामुळे चालकपदाच्या उमेदवारांची तंत्रशुद्धता, तांत्रिक कौशल्य व बुद्धीमत्तेची रविवारी कसोटी लागणार आहे. पोलिस चालक शिपाई पदांकरिता जानेवारीमध्ये चाचणी घेण्यात आली होती. या चाचण्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली गेली. राज्यातील सर्व चालक पदांच्या मैदानी चाचणीचे निकाल आल्यानंतर आता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. रविवारी (दि.२६) भुजबळ नॉलेज सिटीच्या महाविद्यालयात ही परीक्षा पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी सकाळी साडेसहा वाजता मैदानावर हजर राहणे आवश्यक असल्याचे अधीक्षक कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.
या वस्तू घरीच विसरा...
मोबाइल, इलेक्ट्रॉनिक मनगटी घड्याळ या वस्तू उमेदवारांनी घरीच ठेवू आलेले योग्य राहणार आहे. लेखी परीक्षा चाचणीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणशर आहे. तसेच अक्षीक्षकांच्या आदेशान्वये चोख बंदोबस्तदेखील याठिकाणी नेमण्यात येणार आहे. प्रत्येकाने मुळ ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.
शिपाई वाहनचालक पदे : १५
दाखल अर्ज : २,११४
मैदानी चाचणीला हजर : १,२४०
चाचणीसाठी पात्र उमेदवार : १,०२२
लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार : १२४