जिल्हा विज्ञान प्रदर्शनात १२८ उपकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 04:57 PM2019-01-17T16:57:17+5:302019-01-17T17:01:39+5:30
जिल्हा परिषदेकडून तीन वर्षांपासून जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी दिला जाणारा सेस निधी बंद झालेला होता. तो प्रदर्शनासाठी सुरु करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केली. विज्ञान प्रदर्शनात जिल्हाभरातून १२८ उपकरणाचा सहभाग होता.
तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा टेक्निकल कॅम्पस येथे ४४ व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रवरा ग्रामीण विकास संघाचे संचालक डॉ. हरिभाऊ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक डी. यु. खर्डे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष डी. यु. अहिरे, कार्यवाह सुनील भामरे, विनीत पवार, वाय. आर. पवार, पुरूषोत्तम रकिबे, सचिन शेवाळे, एन. एम. खैरनार, एस. बी. शिरसाठ, राजेंद्र सावंत, दादाजी अहिरे,संग्राम करंजकर, माणिक मढवई, दीपक ह्याळीज, डॉ. चारूशीला भंगाळे, डॉ. विजय तांबे, संजीव पाटील, डी. यु. पाटील, उल्हास पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाशिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी प्रदर्शनातील उपकरणांचा आढावा घेतला. विज्ञान प्रदर्शनात जिल्हाभरातून १२८ उपकरणाचा सहभाग होता. प्रत्येक तालुक्यातून माध्यमिक गटातून ४८ उपकरण, प्राथमिक गटातून ४८ उपकरण व शिक्षकांच्या ३२ उपकरणांनी प्रदर्शनात सहभाग घेतला.