१३ दुचाकी हस्तगत : मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:24 PM2019-02-13T17:24:22+5:302019-02-13T17:24:43+5:30

पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुले कधी येतात कोठे जातात? कोणासोबत फिरतात? यावर लक्ष ठेवल्यास कमी वयात गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे पोलिसांनी सांगितले.

13 Bike Grip: Two-wheeled theft from minors to spend on girlfriends | १३ दुचाकी हस्तगत : मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी

१३ दुचाकी हस्तगत : मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी

Next
ठळक मुद्दे मैत्रिणींवर खर्च करण्याच्या चंगळवादात हे दोघे मुले गुन्हेगार

नाशिक : जुने नाशिक परिसरातील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या वाहनतळात रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या उभ्या असलेल्या दुचाकी चोरण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. भद्रकाली पोलिसांनी त्यांना ‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर त्यांनी जुने नाशिक, गंगापूररोड आदि भागातून तब्बल १३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांची किंमत अंदाजे ५ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुने नाशिक परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. अल्पवयीन चोरट्यांची टोळी या गुन्हेगारीमध्या असल्याचा संशय होता. पोलिसांचे गुन्हे शोध पथक त्या दिशेने तपास करत होते; मात्र पोलिसांच्या हाती चोरटे लागत नव्हते. शनिवारी (दि.९) दोघा अल्पवयीन चोरट्यांनी झाकीर हुसेन रुग्णालयाचे वाहनतळ गाठून त्यामध्ये उभ्या असलेल्या दुचाकींमधून काही दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न केला. काही जागरूक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्या दोघा चोरट्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, तत्काळ भद्रकाली पोलीसांचे पथक घटनास्थळी आले व दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले. महापालिकेने रुग्णालयाला सुरक्षारक्षक पुरविले असतानाही या दोघा अल्पवयीन चोरट्यांनी दुचाकी चोरीचे धाडस केले तरीदेखील सुरक्षारक्षकांच्या ही बाब लक्षात आली नाही हे विशेष!
भद्रकाली पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी टाकसाळ लेनमधून करण संजय लोणारी यांच्या राहत्या घरासमोरून अ‍ॅक्टीवा (एम.एच.१५ डीएन ०१५८) चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.हे दोघे अल्पवयीन चोरटे तेरा दुचाकी विविध ठिकाणांवरून चोरण्यास सफल झाले, यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, या दोघा अल्पवयीन मुलांच्या पाठीमागे मुख्य म्होरक्या कोण? याचा पोलीस शोध घेत आहेत.
मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी पैसे नसल्यामुळे दुचाकी चोरी शहर व परिसरात सुरू केल्याची धक्कादायक माहिती या गुन्ह्याच्या तपासातून समोर आली आहे. पाच गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून उर्वरित दुचाकी कोठून व कधी चोरी केल्या त्याचा तपास पोलीस करत आहेत. अल्पवयात मैत्रिणींवर खर्च करण्याच्या चंगळवादात हे दोघे मुले कधी गुन्हेगार झाले, हे त्यांनाही कळले नाही. जेव्हा पोलिसांनी बेड्या ठोकल्या तेव्हा अपाण चुकीच्या मार्गावर गेल्याची जाणीव झाली; मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुले कधी येतात कोठे जातात? कोणासोबत फिरतात? यावर लक्ष ठेवल्यास कमी वयात गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे पोलिसांनी सांगितले.

जप्त केलेल्या दुचाकी अशा
युनिकॉन (एम.एच१५ डीआर १०१५), ड्रीम युगा (एम.एच.१५ डीक्यू ४८८३), पॅशन (एम.एच१५ अ‍ेझेड ९५०३), पॅशन प्रो (एमएच१५ बीझेड १५१३), स्पलेंडर (एम.एच१५ अ‍ेझेड ९९६८), अ‍ॅम्बीशन (एम.एच १५ अ‍ेझेड ७१५९), एलएमएल (एम.एच१५ अ‍ेटी ३५३०), स्पेलेंडर (एम.एच१५ अ‍ेएल०८६१), स्पेलेंडर प्रो(एम.एच४१ अ‍ेएक्स २०२९), स्पेलेंडर प्रो (एम.एच१५ डीक्यू ५००६), स्पेलेंडर (एम.एच४१ जे ४१३०), प्लेझर (एमएच१५ सीपी४२२२)चोरीला गेलेल्या या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
 

Web Title: 13 Bike Grip: Two-wheeled theft from minors to spend on girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.