बिबट्याला पकडण्यासाठी लावले १३ पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:43 AM2018-09-05T00:43:14+5:302018-09-05T00:43:38+5:30

दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे तीनवर्षीय बालकावर हल्ला करत पसार झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात ठिकठिकाणी सुमारे १३ पिंजरे लावले असून, ८० हून जास्त वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

13 cages to catch a leopard | बिबट्याला पकडण्यासाठी लावले १३ पिंजरे

बिबट्याला पकडण्यासाठी लावले १३ पिंजरे

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामस्थांचे शिष्टमंडळ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार

दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे तीनवर्षीय बालकावर हल्ला करत पसार झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात ठिकठिकाणी सुमारे १३ पिंजरे लावले असून, ८० हून जास्त वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
परमोरी येथे सोमवारी सायंकाळी बिबट्याने सार्थक ज्ञानेश्वर दिघे या तीनवर्षीय बालकावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. वनविभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. मंगळवारी सकाळी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी शिवबाला यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. मृत बालकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत उपाययोजना व सावधानता बाळगण्याच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. वनविभाग बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सर्वतोपरी उपाययोजना करेल, असे आश्वासन देत व वनअधिकाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिवबाला यांनी केले. यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वन कर्मचाºयांच्या तुकड्या परमोरीत हजर झाल्या. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी वनकर्मचाºयांनी पाहणी केली. परमोरी व परिसरातील वरखेडा, अवनखेड, लखमापूर, करंजवण, पिंपळगाव केतकी आदी परिसरात १३ पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी विविध ठिकाणी कॅमेरेही लावण्यात आले आहेत. दरम्यान, आमदार झिरवाळ यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधत बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करून उपाययोजना करावी, असे साकडे घातले. याबाबत विचार-विनिमय करून मार्ग काढण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असून, आमदार झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली परमोरी व परिसरातील वरखेडा, अवनखेड, लखमापूर, करंजवण, पिंपळगाव केतकी, म्हेळुस्के, ओझे, राजापूर, चिंचखेड, लोखंडेवाडी आदी गावांतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत.


 

Web Title: 13 cages to catch a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल