तणनाशक फवारल्याने १३ लाख रोपे नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 10:48 PM2020-06-27T22:48:01+5:302020-06-27T22:48:35+5:30
नामपूर : येथील बालाजी हायटेक नर्सरी भाजीपाला रोपवाटिकेतील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारल्याने नर्सरीमधील तयार असलेली १३ लाख रोपे नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नामपूर : येथील बालाजी हायटेक नर्सरी भाजीपाला रोपवाटिकेतील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारल्याने नर्सरीमधील तयार असलेली १३ लाख रोपे नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.
नर्सरीमालक शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करत शेतकºयाने रोपवाटिकेत दिवसरात्र मेहनत करून रोपवाटिका फुलवली. मात्र अज्ञात समाज-कंटकांनी तणनाशक फवारून रोपवाटिकेतील सर्वच रोपे जळून नष्ट केल्याने रोपवाटिकेचे नुकसान झाले आहे.
अद्ययावत तंत्र वापरून खाणकरी यांनी बालाजी नर्सरी अद्यावत बनवली आहे. मात्र काही समाजकंटक असतात हे या रोपे नष्ट करण्याची घटनेतून दिसून आले आहे. या घटनेने दोन दिवसानंतर रोपे जळू लागल्याने खानकरी यांच्या लक्षात आले. रोपांची तपासणी केली असता त्यावर तणनाशक फवारणी झाल्याचे लक्षात आले. वाटिकेत १३ लाख रोपे तयार अवस्थेत होतो ती सर्व नष्ट झाल्याने नर्सरी मालकाचे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे खानकरी यांनी सांगितले. अज्ञात इसमाविरुद्ध जायखेडा पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करत आहे.नर्सरीमधील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषधाची फवारणी केल्याने तयार असलेली मिरचीचे चार लाख रोपे, टमाट्याचे पाच लाख, कोबीचे चार लाख असे एकूण १३ लाख तयार रोपांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आॅर्डरप्रमाणे रोपे तयार करण्यात आली होती. तयार रोपे नष्ट झाल्याने अनेक शेतकºयांची भाजीपाला लागवड होणार नसल्याने नर्सरीचे व इतर शेतकºयांचे नुकसान झाले आहे.
- संदीप खानकरी,
बालाजी नर्सरीचे मालक