मनपाच्या बिटको रुग्णालयात १३ वैद्यकीय शिक्षणक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:12 AM2020-12-08T04:12:36+5:302020-12-08T04:12:36+5:30
महापालिकेच्या बिटको रुग्णालायात पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळत नसल्याने पदव्युत्तर शिक्षणक्रम सुरू केल्यास ...
महापालिकेच्या बिटको रुग्णालायात पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळत नसल्याने पदव्युत्तर शिक्षणक्रम सुरू केल्यास त्यातून किमान प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स उपलब्ध होतील या अपेक्षेने महापालिकेने २०१५ पासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आता ते पूर्ण होत असून, सीपीसीचे १३ शिक्षणक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहेत. यात ईएनटी, बालरोगतज्ज्ञ, रेडीओलॉजी अशा अनेक शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
इन्फो...
दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या स्वच्छतेच्या ठेक्यासंदर्भात बरीच चर्चा आणि संशय व्यक्त झाल्यानंतर कार्योत्तर मंजुरी देण्याचा प्रस्ताव सलग सातव्यांदा तहकूब करण्यात आला. ५६ लाख १५ हजार रुपये कार्योत्तर मंजुरी देण्याचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यानंतर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी कामाच मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढीचा करार कसा काय केला याबाबत प्रश्न विचारला असता प्रशासन समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा तहकूब करण्यात आला.
इन्फो...
स्वाती भामरे यांना संधी
महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी असलेल्या भाजपाच्या हिमगौरी आडके यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर भाजपने स्वाती भामरे यांची नियुक्ती केली. महापौरांनी तशी घोषणा महासभेत केली.