त्र्यंबकेश्वर तालुक्यात नवीन १३ गाव पाणीपुरवठा योजना मंजुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:57 PM2018-08-07T12:57:59+5:302018-08-07T12:58:15+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत.

 13 new water supply schemes approved in Trimbakeshwar taluka! | त्र्यंबकेश्वर तालुक्यात नवीन १३ गाव पाणीपुरवठा योजना मंजुर !

त्र्यंबकेश्वर तालुक्यात नवीन १३ गाव पाणीपुरवठा योजना मंजुर !

Next

त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत.तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत देखील नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आल्याने येत्या वर्ष दिड वर्षात तालुका जलयुक्त शिवार योजनेतुन सन२०१४/१५ साठी १८ गावे, सन १५-१६ साठी ९ गावे, सन २०१७-१८ साठी पाच गावे असे मिळुन एकुण ३२ गावे यापुर्वीच जलयुक्त शिवाराने शेतीसाठी उपयुक्त झाली आहेत. आता नव्याने सन २०१८-१९ साठी नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक तयारी सुरु असुन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधीकरण या विभागामार्फत या १३ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतील. तथापि ही गावे धरणांपासुन दुर असली तरी परक्युलेशन परिसरात विहीरीस पाणी लागेल अशा ठिकाणी त्यानंतरच १३ गावांना कोणकोणत्या ठिकाणी पाणी लागेल. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडुन जागेबाबत शिफारस केल्यावरच योजनेसाठी विहीर घेण्यात येईल. तत्पुर्वी सर्व गावांच्या योजनांचे एस्टीमेट करणे ते एस्टीमेट मंजुर करु न घेणे योजनेचे प्लॅन एस्टीमेटला प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर निधी मंजुर होईल. शेवटी तांत्रिक मंजुरी मिळाल्यावरच प्रत्यक्षात कामे सुरु होतील. त्यामुळे पुढच्या वर्षा पर्यंत ही कामे पुर्ण होतील की नाही हे आज तरी सांगता येत नाही. तथापि कामे पुर्ण झाल्यानंतर मात्र योजना यशस्वी झाल्यास तालुका ख-या अर्थाने टँकरमुक्त होईल यात शंका नाही.
----------------------------
त्र्यंबकेश्वर अति पावसाचा तालुका. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या खालोखाल गणला जातो. दरवर्षी २२०० ते २५०० मिमि पर्यंत पावसाची सरासरी साधारणपणे असते. तथापि तालुक्याची भौगोलिक परिस्थिती डोंगराळ भागाची आहे. उंच सखल डोंगरावरु न पडलेले पाणी डोंगर उतारावरु न वाहन जाते. तालुक्यात सन २००५-०६ पासुन आतापर्यंत १०० वर योजना झाल्या असतील पण त्यातील काही योजना पुर्ण झाल्या तर ११योजना भ्रष्टाचारात वाहुन गेल्या. अशा योजनांच्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारत निर्माण योजना कार्यक्र मात पुर्वी या योजना राबविल्या. आता फक्त नाव बदलले.आता राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत नव्याने या योजना राबविण्यात येत आहेत.
--------------------------
जलयुक्त शिवार योजनेमुळे तालुक्यातील ५४ गावे जलयुक्त शिवाराने समृध्द होणार असल्याने एकीकडे टँकरमुक्त गावे तर दुसरीकडे जलयुक्त शिवाराच्या गावांनी शेती समृध्द होणार आहे. शेतीचे सपाटीकरण शेतीत कायम स्वरु पी ओलावा परिणामी तिनही हंगामात बाराही महिने वेगवेगळी पिके घेता येतील. कायम टंचाईच्या खाईत सापडलेल्या गावांना टंचाई मुक्त करण्याचा आमचा मानस आहे.
- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

Web Title:  13 new water supply schemes approved in Trimbakeshwar taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक