कंटेनरला बसची धडक १३ प्रवासी जखमी

By admin | Published: May 28, 2017 12:25 AM2017-05-28T00:25:47+5:302017-05-28T00:26:10+5:30

चांदवड : राहुड घाटात मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भरधाव जाणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. याबाबत बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 passengers injured in container injuries | कंटेनरला बसची धडक १३ प्रवासी जखमी

कंटेनरला बसची धडक १३ प्रवासी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : राहुड घाटात मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भरधाव जाणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. याबाबत बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला (क्र. एचआर ३८ व्ही २६७३) गुरुवारी भरधाव जाणाऱ्या नाशिक - खामगाव एसटी बसने (क्र. एमएच ४० वाय ५४७६) मागून जोरदार धडक दिल्याने बसमधील १३ प्रवासी जखमी झाले. त्यांना सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेने तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात बसचे नुकसान झाले. चांदवड पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार फुलमाळी तपास करीत आहेत.
जखमींची नावे
शिवाजी पाटील (वय ४०, अमळनेर), पद्माकर कुलकर्णी (८१, अकोला), वत्सला साळवे
( ६५, चांदवड), सुधीर कुलकर्णी (७०, मलकापूर), सुरेश साळवे (४५, रा.चांदवड), हिमांशू पाटील (९, अमळनेर), अनुष्का पाटील (११, अमळनेर), अलका देसाई (४०, झोडगे), रेखा पाटील (३७, अमळनेर), सुरेश टुले (५०), जळगाव, शलिनी देशपांडे (७५, जळगाव), सुधाकर कुलकर्णी (८१, शेगाव), सोनाली जाधव (२६, नाशिक)़

Web Title: 13 passengers injured in container injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.