टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा
By admin | Published: May 29, 2015 11:34 PM2015-05-29T23:34:32+5:302015-05-29T23:34:57+5:30
टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा
नाशिक : उन्हाळ्याचा तडाखा वाढताच ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असून, येवला, सिन्नर, पेठ, सुरगाणा व नांदगाव या तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याची परिस्थितीत समाधानकारक असल्याचा दावा शासकीय यंत्रणा करीत असली तरी, गेल्या वर्षी सिन्नरला उघडकीस आलेला टॅँकर घोटाळा पाहून प्रशासनानेच टॅँकर मंजूर करताना हात अखडता घेतल्याची तक्रार केली जात आहे. गेल्या वर्षी म्हणजे २८ मे २०१४ रोजी जिल्'ात १२२ गावे, २७२ वाड्यांना १२० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र १३२ गावे, २०२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे ३२२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल महिन्यापर्यंत जिल्'ात अवकाळी पाऊस कायमस्वरूपी ठाण मांडून बसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाल्याचा किंबहुना उशिराने टॅँकर सुरू करावे लागल्याचा दावा प्रशासन करीत आहे. प्रत्यक्षात उन्हाळ्याचा तडाखा मे महिन्याच्या प्रारंभापासूनच वाढल्याने अगोदरच तळ गाठलेल्या नद्या, नाल्यांबरोबर विहिरींमध्येही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरशिवाय पर्यायच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काही गावे, वाड्यांना टॅँकर मंजूर करण्यात आले असले तरी, टॅँकर मंजूर करताना शासकीय यंत्रणा हात अखडता घेत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून केल्या जात आहे. विशेष करून सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी टॅँकर घोटाळा उघडकीस आल्याने शासकीय अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई बघता यंदा टॅँकर मंजूर करण्यास यंत्रणा अनुत्सुक आहे. त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयांवर पाण्यासाठी हंडा मोर्चे काढले जात आहेत, तर काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयांना कुलुपे ठोकण्यात आली आहेत. उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास टॅँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकट==== तालुका निहाय टंचाई बागलाण - १५ गावे, ८ टॅँकर चांदवड - ११ गावे, ४ टॅँकर दिंडोरी - २ गावे, १ टॅँकर देवळा - १४ गावे, ७ टॅँकर इगतपुरी- ११ गावे, ५ टॅँकर मालेगाव - १ गाव, १ टॅँकर नांदगाव - ८१ गावे, ११ टॅँकर पेठ - ७ गावे, ३ टॅँकर सुरगाणा - ४८ गावे, ११ टॅँकर सिन्नर - ६८ गावे, १३ टॅँकर त्र्यंबक- २९ गावे, ७ टॅँकर येवला-४७, १५ टॅँकर