येवल्यात १३ अहवाल पॉझीटीव्ह दोघांचा मृत्यू; सहा कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:39 PM2020-09-09T20:39:48+5:302020-09-10T01:11:50+5:30
येवला : तालुक्यातील १३ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी, (दि. ९) पॉझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील अंदरसुल व उंदिरवाडी येथील दोघा बाधित पुरूषांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ६ बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क

बाधितांमध्ये पटेल कॉलनीतील ५३ वर्षीय महिला, बुरूड गल्लीतील ४७ वर्षीय महिला, विठ्ठल नगरातील ४९ वर्षीय पुरूष, तालुक्यातील अंदरसुल येथील ७०, ३० वर्षीय महिला व २७ वर्षीय पुरूष, सावरगाव येथील ६२ वर्षीय महिला, अनकाई येथील ७० व ४३ वर्षीय महिला, उंदिरवाडी येथील ४४ व २७ वर्षीय पुरूष, वाघाळे येथील ६० वर्षीय पुरूष, सायगाव येथील ४८ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. अंदरसुल येथील ६० वर्षीय पुरूषाचा खाजगी रूग्णालयात तर उंदिरवाडी येथील ६२ वर्षीय बाधित पुरूषाचा नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ४५९ झाली असून आजपर्यंत ३३६ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ८७ असल्याची माहिती तालुका आरोग्य डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली. बाधितांपैकी बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात २३, होम कॉरंटाईन ३३, नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १३, नाशिक जिल्हा रूग्णालयात ६ तर नाशिक येथील खाजगी रूग्णालयात १२ बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.