आजी-माजीसह १३ जणांची माघार

By admin | Published: February 7, 2017 12:51 AM2017-02-07T00:51:26+5:302017-02-07T00:51:52+5:30

नाशिकरोडला १७ जणांची माघार

13-year-old ex-boyfriend remanded | आजी-माजीसह १३ जणांची माघार

आजी-माजीसह १३ जणांची माघार

Next

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी पंचवटी विभागातील विद्यमान नगरसेवकांसह दोघा माजी नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. माघारीच्या पहिल्याच दिवशी पंचवटीत एकूण १३ इच्छुकांनी माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून विद्यमान नगरसेवक रूपाली गावंड यांनी ‘ड’ गटात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचे पती हेमंत शेट्टी याच गटातून निवडणूक रिंगणात उतरले असल्याने गावंड यांनी अर्ज मागे घेतला, तर प्रभाग क्र मांक ५ मधून माजी नगरसेवक उल्हास धनवटे हेदेखील निवडणूक रिंगणात असल्याने त्यांच्या पत्नी माजी नगरसेवक जयश्री धनवटे यांनी ५ क गटातून अर्ज मागे घेतला आहे. (वार्ताहर)
नाशिकरोडला  १७ जणांची माघार
नाशिकरोड : मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारी पहिल्या दिवशी नाशिकरोडच्या सहा प्रभागातून एकूण १७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या मंगळवारी माघारीचा शेवटचा दिवस असून, त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. नाशिकरोड विभागातील ६ प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेनंतर एकूण २९१ इच्छुकांचे उमेदवारी अर्ज राहिले होते. माघारीच्या सोमवारी पहिल्या दिवशी प्रभाग १७ अ - शरद विक्रम गांगुर्डे, १८ अ- बाबासाहेब विश्वनाथ अस्वले, विशाल चंद्रकांत पवार, खिलेंद्रकुमार दिलीप मोहबिया, गौतम बन्सी पगारे, जितेंद्र बाळु बराते, क- मुक्ता बाळासाहेब पोरजे, ड- विशाल रवींद्र चावरिया, प्रभाग १९ अ- संदीप लक्ष्मण पवार, मनिषा सुनील कांबळे, क- भारती अंबादास ताजनपुरे, राहुल अंबादास ताजनपुरे, प्रभाग २० अ- अमोल दिनकर पगारे, कोमल प्रताप मेहरोलिया, प्रभाग २१ ब- सुधाकर निवृत्ती जाधव, ड- मसुद जिलानी शेख, राजेंद्र शंकर मंडलिक या १७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
सातपूर प्रभागातून १२ अर्ज माघार
सातपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी चार प्रभागातून १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विद्यमान नगरसेवक लता पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. तर विद्यमान स्थायी सभापती सलीम शेख यांनी प्रभाग क्र . १० मधून माघार घेतली असून, ते प्रभाग क्र . ११ मधून लढत आहेत. महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीनंतर १४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक ८ मधून गजेंद्र गुंजाळ (सर्वसाधारण), शिवाजी पवार, जयराम पवार, भिवानंद काळे, भगवान तालखे (अनुसूचित जाती), प्रभाग क्र मांक ९ मधून जनाबाई इघे (सर्व सधारण महिला), विद्यमान नगरसेवक लता पाटील (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्र मांक १० मधून विद्यमान नगरसेवक सलीम शेख, किशोर निकम (सर्वसाधारण), प्रभाग क्र मांक ११ मधून तुळसाबाई काळे (अनुसूचित जाती महिला), नीलेश भंदुरे (ओबीसी), मीरा धात्रक (सर्वसाधारण) आदि १२ उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. माघारीनंतर १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दि. ८ रोजी माघारीचा शेवटचा दिवस आहे. खरे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: 13-year-old ex-boyfriend remanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.