येवला तालुक्यात थकले १३० कोटींचे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:39+5:302021-06-16T04:20:39+5:30
थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जात असल्याचेही इंगळे यांनी सांगितले. महावितरणतर्फे वीज ग्राहकांना वारंवार विनंती करून व नोटीस पाठवूनसुद्धा ...
थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जात असल्याचेही इंगळे यांनी सांगितले. महावितरणतर्फे वीज ग्राहकांना वारंवार विनंती करून व नोटीस पाठवूनसुद्धा गेल्या मार्च २०२१ पासून ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा केला नाही. परिणामी, महावितरणने घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषिपंप व दिवाबत्ती वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत जवळपास ९० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी विजेचे देयक तात्काळ भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे व वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहनही उपकार्यकारी अभियंता इंगळे यांनी केले आहे.
बॉक्स -
थकबाकी जून - २०२१
घरगुती - ३.६७
औद्योगिक - १.९६
वाणिज्य - ०.९१
कृषी - १११
दिवाबत्ती - १२.६६
एकूण - १३०.२