आरटीईच्या ४,५४४ जागांसाठी १३ हजार ३२७ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:34+5:302021-04-04T04:14:34+5:30

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत १३ हजार ३२७ अर्ज दाखल झाले ...

13,327 applications for 4,544 RTE seats | आरटीईच्या ४,५४४ जागांसाठी १३ हजार ३२७ अर्ज

आरटीईच्या ४,५४४ जागांसाठी १३ हजार ३२७ अर्ज

Next

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत १३ हजार ३२७ अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. आरटीई प्रवेशप्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील ९१ शाळांसह जिल्ह्यातील ४५० शाळांची नोंदणी झाली असून, शहरातील ९१ शाळांमध्ये १ हजार ५४६, तर उर्वरित जिल्ह्यातील ३५९ शाळांमध्ये २९९८ विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत जागा राखीव आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे १३ हजार ३२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली तरी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये मात्र १ हजार १३ जागांनी घट झाली आहे.

पॉईंटर

नोंदणीकृत शा‌ळा -४५०

उपलब्ध जागा - ४५४४

प्राप्त अर्ज १३३२७

इन्फो-

आता लक्ष लॉटरीकडे

आरीटी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य नसल्याने राज्य पातळीवर एकाच वेळी सोडत काढली जाणार आहे. उपलब्ध जागांच्या प्रमाणातच प्रतीक्षा यादीही या सोडतीच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आता ऑनलाइन अर्ज करणाऱ्या पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे.

इन्फो

अशी आहेत आव‌श्यक कागदपत्र

आरटीई प्रवेशप्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशाची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावरील पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही.

कोट -१

आरटीई प्रवेशामुळे मुलांना चांगल्या शा‌ळेत शिकविण्यासाठी आधार मिळतो. किमान शैक्षणिक शुल्क माफ झाले तरी इतर खर्च मोलमजुरी करून भागवता येतो. मात्र लॉटरीत नंबर लागला नाही तर चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाचे सामान्य विद्यार्थी स्वप्नही पाहू शकत नाही.

- संदीप कोकणे, पालक

कोट -

मोठ्या शाळांमध्ये मोठ्या रकमांचे शुल्क आकारले जात असले तरी आरटीईमुळे गरिबांच्या मुलांनाही चांगल्या दर्जाचे मोफत शिक्षण मिळते. तसेच घराच्या परिसरातच शाळा मिळत असल्याने बसचा खर्चही येत नाही. पण सोडतीत प्रवेशाची संधी मिळाली नाही, आर्थिक दुर्बल घटकातील पालक अशा शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा विचारही करू शकत नाही.

- कृष्णा पवार, पालक

कोट -१

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. आता लॉटरी कधी निघणार याकडे लक्ष आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वेळेत प्रवेश प्रक्रिया झाली नाही, तर आरटीई अंतर्गतही प्रवेश मिळत नाही. तसेच जवळपासच्या अनुदानित शाळांमध्येही प्रवेश मिळत नसल्याने मुलांच्या प्रवेशासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे आरटीई प्रवेश वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे.

विलास जाधव, पालक

इन्फो-

आरटीई प्रवेशप्रक्रियेत जिल्हास्तरावर ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी तब्बल १३ हजार २२७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. यात मनपा क्षेत्रातील ९१ शाळांमधील १५४६ जागांचा समावेश असला तरी अद्याप तालुकानिहाय उपलब्ध जागांसाठी किती विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. याविषयी शिक्षण विभागाकडे कोणतीही माहिती नाही. प्रामुख्याने शहरातील विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा करूनही संधी मिळत नसताना ग्रामीण भागात मात्र अनेकदा जागा रिक्त राहत असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

Web Title: 13,327 applications for 4,544 RTE seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.