जिल्ह्यात १३५ सामाजिक आरोग्य अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 11:19 PM2020-05-08T23:19:24+5:302020-05-09T00:09:51+5:30

नाशिक : मालेगावसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव व त्या मानाने अपुऱ्या पडणाºया आरोग्य व्यवस्थेचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने १३५ सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

 135 social health officers appointed in the district | जिल्ह्यात १३५ सामाजिक आरोग्य अधिकारी नियुक्त

जिल्ह्यात १३५ सामाजिक आरोग्य अधिकारी नियुक्त

googlenewsNext

नाशिक : मालेगावसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव व त्या मानाने अपुऱ्या पडणाºया आरोग्य व्यवस्थेचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने १३५ सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व वैद्यकीय अधिकाºयांची मालेगाव व कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने नेमणूक देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याचा भाग म्हणून प्रत्येक गावात किंबहुना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी बीइएमएस शैक्षणिक पात्रता प्राप्त उमेदवारांना सामाजिक आरोग्य अधिकारी म्हणून नेमणूक देण्याचे आदेश दिले आहेत. कंत्राटी पद्धतीने त्यांची नेमणूक करण्यात येणार असली तरी, चार महिन्यांपूर्वी त्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.
विशेष करून ग्रामीण भागात कोरोनावर उपचार करण्यासाठी गावोगावी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याने या केंद्रासाठी आरोग्य अधिकाºयांची निकड होती ती पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने दोन दिवसांपूर्वी १३५ सामाजिक आरोग्य अधिकाºयांची आॅनलाइन मुलाखत व नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी या अधिकाºयांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करून दिली.
------
आरोग्य यंत्रणेवर ताण
जिल्ह्यात कोरोनाचे संकट घोंगावत असताना गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी १७० सामाजिक आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती केली होती. या सर्वांना ग्रामीण भागात नेमणूक देण्यात आल्या होत्या, मात्र मे महिन्यात येवला, सिन्नर, मनमाड, चांदवड, बागलाण, दाभाडी या ग्रामीण भागात कोरोनाचा उपद्रव वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे.

Web Title:  135 social health officers appointed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक