शहरात पाच केंद्रांवर १३७ पिशव्या रक्तसंकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:16+5:302021-07-15T04:12:16+5:30

नाशिक : ‘लोकमत’ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून नाशिक शहरात बुधवारी (दि. १४) पाच ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण १३७ ...

137 bags of blood collected at five centers in the city | शहरात पाच केंद्रांवर १३७ पिशव्या रक्तसंकलन

शहरात पाच केंद्रांवर १३७ पिशव्या रक्तसंकलन

Next

नाशिक : ‘लोकमत’ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून नाशिक शहरात बुधवारी (दि. १४) पाच ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण १३७ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले.

‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, रोटरी क्लब यासह २३ संघटनांच्या माध्यमातून झालेल्या रक्तदान शिबिरात ८० पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. करसल्लागार संघटनेच्या वतीने जीएसटी भवनला झालेल्या रक्तदान शिबिरात ४१ तर नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात झालेल्या रक्तदान शिबिरात २०, बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय कार्यालयात ९ तर संदीप फाउंडेशनमधील शिबिरात ७ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दिंडोरीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: 137 bags of blood collected at five centers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.