शहरातील १३७ रुग्णालयांकडे फायर एनओसीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:12+5:302021-01-15T04:13:12+5:30

मुंबई शुश्रूषागृहे अधिनियम १९४९ आणि २००६ अन्वये महापालिका हद्दीतील रुग्णालये, प्रसूतिगृहे, नर्सिंग होमची दर तीन वर्षांनी वैद्यकीय विभागाकडे ...

137 hospitals in the city do not have fire NOC | शहरातील १३७ रुग्णालयांकडे फायर एनओसीच नाही

शहरातील १३७ रुग्णालयांकडे फायर एनओसीच नाही

Next

मुंबई शुश्रूषागृहे अधिनियम १९४९ आणि २००६ अन्वये महापालिका हद्दीतील रुग्णालये, प्रसूतिगृहे, नर्सिंग होमची दर तीन वर्षांनी वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात ६ डिसेंबर २००८ पासून महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ लागू करण्यात आला आहे. त्यातच कोलकाता आणि सूरत येथील दुर्घटनेनंतर अग्निशमन विभागाचे गांभीर्य अधिकच वाढले.

शहरात खासगी रुग्णालये बांधताना महापालिकेच्या अग्निशमन दलाचा ना हरकत परवाना आवश्यक असतो. त्यानुसार या विभागाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत संबंधितांना अनेक उपाययोजना आणि उपकरणे सांगितली जातात आणि ती व्यवस्था झाल्यानंतरच नगररचना विभाग पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. नगररचना विभागदेखील दोन जिने, पुरेसे सामासिक अंतर अशा अनेक बाबी तपासून घेते. त्यानंतर रुग्णालय सुरू केल्यानंतरदेखील वेळोवेळी फायर ऑडिट करण्यास सांगितले जाते. मान्यताप्राप्त एजन्सीकडून अशाप्रकारे ऑडिट केल्यानंतरच अग्निशमन दल एनओेसी देते आणि त्यानंतर महापालिकेचा वैद्यकीय विभाग त्यांना व्यवसायासाठी लागणाऱ्या नोंदणीचे नूतनीकरण करून देत असतो. नाशिक महापालिकेत चार ते पाच वर्षांपूर्वी हा विषय चांगलाच गाजला होता. त्यामुळे बहुतांश रुग्णालयांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, काहींनी ठरावीक कालावधीनंतर फायर ऑडिट करून एनओसी ‌घेतलेली नाही. त्यामुळे १३७ खासगी रुग्णालये एनअेासी विनाच असल्याचे आढळले आहे.

कोट...

नाशिक शहरातील ज्या रुग्णालयांची फायर ऑडिट करून एनओसी घेतलेली नाही. त्यांचे नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे संबंधित रुग्णालये नूतनीकरण करतील. नाशिक महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे फायर ऑडिट २०१९ मध्ये पूर्ण झाले होते. ते आता पुन्हा करण्यासाठी प्रस्ताव आहे.

- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक मनपा,

इन्फो...

खासगी रुग्णालयांना महापालिकेच्या वतीने फायर ऑडिटच सक्ती केली जात असताना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मात्र नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट अद्याप झालेले नाही. त्यांनी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे, तर दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयांना अग्निशमन नियमांची अंमलबाजवणी न केल्यास नोंदणीचे नूतनीकरण न करणाऱ्या महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांचेदेखील फायर ऑडिट झालेले नाही.

इन्फो...

नोंदणी असलेली रुग्णालये ५७१

नोंदणी नसलेली रुग्णालये १३७

नोंदणी असलेली रुग्णालये ४३४

इन्फो..

नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत रुग्णालयात दुर्घटनेचा दुर्धर प्रसंग सुदैवाने उद्भवलेला नाही. मात्र, त्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णालयांना २४ तास पाणीपुरवठ्याची सोय करणे, अग्निशमन यंत्रणा बसविणे, इमारतींचा मिश्र वापर असल्यास दोन जिन्यांची व्यवस्था करणे, रुग्णालयांच्या इमारतींमध्ये ठरावीक सामाजिक अंतर सोडणे, खाटांनुसार पार्किंगची व्यवस्था करणे, आदी नियमांचा समावेश आहे. त्याचे मात्र अनेक ठिकाणी पालन होताना दिसत नसल्याची तक्रार आहे.

Web Title: 137 hospitals in the city do not have fire NOC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.