जिल्ह्यात सोमवारी १,३७६ बाधित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:59+5:302021-03-16T04:15:59+5:30

नाशिक : कोरोना रुग्णांचा विस्फोट सलग सहाव्या दिवशीही कायम असून, सोमवारी (दि.१५) एका दिवसात तब्बल १,३७६ रुग्णबाधित आढळून आले ...

1,376 affected in the district on Monday! | जिल्ह्यात सोमवारी १,३७६ बाधित !

जिल्ह्यात सोमवारी १,३७६ बाधित !

Next

नाशिक : कोरोना रुग्णांचा विस्फोट सलग सहाव्या दिवशीही कायम असून, सोमवारी (दि.१५) एका दिवसात तब्बल १,३७६ रुग्णबाधित आढळून आले आहेत. सातत्याने कोरोनाबाधितांचे प्रमाण हजारावर राहत असल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेपुढे पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, ५५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नाशिक शहरातून ३, नाशिक ग्रामीणमधून ३ असे एकूण ६ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१७६ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात सोमवारी बाधितांच्या आकड्याने पुन्हा हजाराचा टप्पा पार केल्याने सर्व उपाययोजना अधिक कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता बाधित संख्या किती प्रमाणात वाढेल, त्याचा अंदाज यंत्रणेलादेखील येईनासा झाला आहे. आरोग्य विभागासह प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सलग सहा दिवस बाधित आढळण्याची बाब चिंताजनक असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीनेदेखील दोषींवर आता कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहेे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३४ हजार ९६६ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख २३ हजार ९२३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ८,८६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९१.८२ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९१.१७, नाशिक ग्रामीण ९४.१४, मालेगाव शहरात ८६.३५, तर जिल्हाबाह्य ९२.०२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ८३ हजार २७१ असून, त्यातील चार लाख ४५ हजार ५१३ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख ३४ हजार ९६६ रुग्णबाधित आढळून आले आहेत, तर २,७९२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

इन्फो

उपचारार्थी संख्या नऊ हजारांनजीक

नवीन रुग्णसंख्येत झालेली मोठी वाढ झाल्याने महानगरातील उपचारार्थी रुग्णांची संख्या नऊ हजारांनजीक अर्थात तब्बल ८,८७६ वर गेली आहे. बाधितांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील वाढता आकडा बघून जिल्हाभरातील बंद करण्यात आलेली अनेक कोरोना सेंटर्स, तपासणी केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: 1,376 affected in the district on Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.