१३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:28 AM2019-06-16T01:28:32+5:302019-06-16T01:29:39+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासनाने जिल्ह्यातील १,३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या केल्या असून, शनिवारी पहाटे याबाबतचे आदेश शासनाने जारी केले आहेत. बदल्या झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली.

1388 Teachers Online Transfers | १३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या

१३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या

Next
ठळक मुद्देतत्काळ कार्यमुक्त । विस्थापितांचे लवकरच समुपदेशन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासनाने जिल्ह्यातील १,३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या केल्या असून, शनिवारी पहाटे याबाबतचे आदेश शासनाने जारी केले आहेत. बदल्या झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या शासन पातळीवरून आॅनलाइन पद्धतीने केल्या जात असून, नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या बदलीचे अर्ज भरण्यासाठी ६ ते ११ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २३०० शिक्षकांनी बदल्यांसाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले. सोमवार, दि. १७ पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत असून, तत्पूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामुळे खुद्द शिक्षण विभागही गेल्या तीन दिवसांपासून शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. शनिवारी पहाटे शासनाने आदेश जारी केले. त्यात विशेष संवर्ग, पती-पत्नी एकत्रितकरण, बदलीपात्र शिक्षक अशा चार टप्प्यातील १,३८८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील मराठी माध्यमातील १३७३, तर उर्दू माध्यमातील १५ शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये विशेष संवर्ग १ मधील २३१, विशेष संवर्ग २ मधील २१८, बदली अधिकार प्राप्त संवर्गातील १४८ व बदली पात्र संवर्गातील ७९१ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत किंबहुना ते विस्थापित झाले आहेत अशा शिक्षकांच्या आॅफलाइन समुपदेशनाने बदल्या करण्याचे अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शनिवारी बदल्या झालेल्या शिक्षकांना दुपारपर्यंत आदेश बजावून तत्काळ कार्यमुक्त व नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आल्याने सोमवारपासून सदरचे शिक्षक आपापल्या शाळेत रुजू होतील तथापि, बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी प्राप्त होताच, सोमवारी त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.
बदली झालेल्या शिक्षकांची संख्या
बागलाण-७३, चांदवड -११५, देवळा-५७, दिंडोरी-९६, इगतपुरी- ११४, कळवण-८४, मालेगाव-१४२, नांदगाव-७५, नाशिक-१६, निफाड- १४३, पेठ-८७, सिन्नर-८६, सुरगाणा-७६, त्रंबकेश्वर-११४ येवला-१०८

Web Title: 1388 Teachers Online Transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.